एक्स्प्लोर

IND vs WI T20 World Cup 2026 : भारत विरुद्ध वेस्टइंडीज, सेमीफायनलचं तिकीट की स्वप्नांचा अंत?, 'करो या मरो' सामन्यापूर्वी कॅरिबियन खेळाडूचा अल्टीमेटम, म्हणाला....

India vs West Indies T20 World Cup 2026 : भारत आणि वेस्टइंडीज यांच्यात टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या सुपर-8 फेरीत 1 मार्च रोजी थरारक सामना रंगणार आहे.

India vs West Indies T20 World Cup 2026 : भारत आणि वेस्टइंडीज यांच्यात टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या सुपर-8 फेरीत 1 मार्च रोजी थरारक सामना रंगणार आहे. सेमीफायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी दोन्ही संघांसाठी हा सामना ‘करो किंवा मरो’ असा आहे. जो संघ जिंकेल तो अंतिम चारमध्ये प्रवेश करेल, तर पराभूत संघाचे या मेगा स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल.  दरम्यान, वेस्टइंडीजचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू रोमारियो शेफर्ड (Romario Shepherd) याने भारताविरुद्धच्या या निर्णायक लढतीपूर्वी मोठे वक्तव्य केले आहे.

रोमारियो शेफर्ड काय म्हणाला?

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवाबाबत बोलताना शेफर्ड म्हणाला, “खरं सांगायचं तर आमच्याकडे पश्चात्ताप करण्यासाठी वेळ नाही. आम्हाला शांत राहून त्या मोठ्या सामन्यासाठी लवकरात लवकर सावरायचं आहे. हा सामना करो किंवा मरोचा आहे आणि आमचं भविष्य आमच्या हातात आहे. आम्ही मैदानात उतरून विजय मिळवू आणि सेमीफायनल गाठू, अशी आशा आहे.”

शेफर्डने स्पष्ट केले की त्यांच्या संघाने किमान 50 धावा कमी केल्या. तो म्हणाला, “जेव्हा फलंदाज बाद होत होते, तेव्हा ते सांगत होते की विकेट अतिशय चांगली आहे. मी स्वतः मैदानात उतरलो तेव्हाही ती खूप चांगली वाटली. पहिल्या काही चेंडूवर फलंदाजी करताना असं वाटलं जणू मी काँक्रीटवर खेळतोय.”

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताला धक्का

सुपर-8 मधील पहिल्या सामन्यात भारताला दक्षिण आफ्रिकेकडून 73 धावांनी मोठा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे टीम इंडियाच्या विजयी मालिकेला खीळ बसली. आता वेस्टइंडीजविरुद्धच्या निर्णायक सामन्यात भारताला आपली खरी ताकद दाखवावी लागणार आहे.

टी-20 विश्वचषक 2026 साठी वेस्ट इंडिजचा संघ (West Indies T20 World Cup 2026 ) : शाई होप (कर्णधार), जॉन्सन चार्ल्स, रोस्टन चेस, मॅथ्यू फोर्ड, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, अकेल होसीन, शामर जोसेफ, ब्रँडन किंग, गुडाकेश मोती, रोव्हमन पॉवेल, शेरफेन रदरफोर्ड, क्वेंटिन सॅम्पसन, जेडेन सील्स, रोमॅरियो शेफर्ड

टी-20 विश्वचषक 2026 साठी भारतीय संघ (India T20 World Cup 2026 ): सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, ईशान किशन, हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रिंकू सिंग.

हे ही वाचा -

IND vs WI T20 World Cup 2026 : जगातील नंबर-1 गोलंदाज OUT, कुलदीप यादव IN; वेस्ट इंडिजविरुद्ध हाय-व्होल्टेज सामन्यात टीम इंडियाची चक्रावणारी Playing XI

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs ENG : भारत की इंग्लंड उपांत्य फेरीचा सामना कोण जिंकणार? आतापर्यंतची आकडेवारी काय सांगते?
IND vs ENG : भारत की इंग्लंड उपांत्य फेरीचा सामना कोण जिंकणार? आतापर्यंतची आकडेवारी काय सांगते?
Pakistan : टी 20 वर्ल्ड कपमधून सुपर 8 मध्येच पाकिस्तानवर गाशा गुंडाळण्याची वेळ, शाहिद आफ्रिदी संतापला, नव्या कर्णधाराचं नाव सुचवलं
आक्रमक खेळाडूकडे कर्णधारपद द्या, पाकच्या टी 20 वर्ल्डकप मधील कामगिरीवर शाहिद आफ्रिदी नाराज, नवं नाव सांगितलं...
T20 World Cup 2026: भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना पावसानं रद्द झाल्यास अंतिम फेरीत कोण पोहोचणार? ICC चा नियम काय सांगतो?
भारत- इंग्लंड उपांत्य फेरीचा सामना पावसानं रद्द झाल्यास काय? अंतिम फेरीत कोण पोहोचणार? ICC चा नियम काय?
Ind vs WI Sanju Samson Celebration T20 World Cup 2026: वेस्ट इंडिजविरुद्ध आक्रमक 97 धावा, भारताला सेमीफायनलमध्ये पोहोचवलं; पण ICC संजू सॅमसनवर कारवाई करण्याची शक्यता, कारण काय?
भारताला सेमीफायनलमध्ये पोहोचवलं; पण ICC संजू सॅमसनवर कारवाई करण्याची शक्यता, कारण काय?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Israel America Attack Iran : इराणकडून हल्ल्याला उत्तर; अमेरिकेचे तळ लक्ष्य Special Report
Mumbai BMC : घरांसाठी मालमत्ता कर सवलतीची मर्यादा 700 चौरस फुटांपर्यंत वाढवणार
Iran Vs Israel Kolhapur Family : मुलं कतारमध्ये, मिसाईल हल्ले पाहिले, कोल्हापूरचे कुटुंबीय भयभीत
Ayatollah Khomeini Special Reportखामेनींच्या हत्येनंतर जगातून प्रतिक्रिया,युद्ध भडकणार की युद्धबंदी?
Sanjay Raut PC : महाविकास आघाडीचा तीन तिघाडा आहे पण काम बिघाडा नाही, तिन्ही पक्षात चर्चा सुरूच!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iron Beam : ना मिसाइल, ना रॉकेट… फक्त एका लेझरमुळे शत्रूचा नायनाट, इस्त्रायलचे ‘आयरन बीम’ प्रथमच रणांगणात
ना मिसाइल, ना रॉकेट… फक्त एका लेझरमुळे शत्रूचा नायनाट, इस्त्रायलचे ‘आयरन बीम’ प्रथमच रणांगणात
Video: इराणचा सौदी अरेबियातील सर्वात मोठी तेल कंपनी अरामकोच्या ऑईल रिफायनरीवर हल्ला; रिफायनरी बंद करताच अवघ्या काही तासात कच्च्या तेलाच्या किंमती किती टक्क्यांनी वाढल्या?
Video: इराणचा सौदी अरेबियातील सर्वात मोठी तेल कंपनी अरामकोच्या ऑईल रिफायनरीवर हल्ला; रिफायनरी बंद करताच अवघ्या काही तासात कच्च्या तेलाच्या किंमती किती टक्क्यांनी वाढल्या?
प्रसिद्ध गायकाचा भीषण अपघात; मुंबईतील मेगा अवॉर्ड शोला जाण्यापूर्वी रस्त्यात भयंकर घडलं, आता प्रकृती कशी?
प्रसिद्ध गायकाचा भीषण अपघात; मुंबईतील मेगा अवॉर्ड शोला जाण्यापूर्वी रस्त्यात भयंकर घडलं, आता प्रकृती कशी?
Iran Israel War : युद्ध इराणमध्ये, धग भारताला; तेल महाग, कांदा-केळी निर्यात ठप्प, शेतकऱ्यांना मोठा फटका
युद्ध इराणमध्ये, धग भारताला; तेल महाग, कांदा-केळी निर्यात ठप्प, शेतकऱ्यांना मोठा फटका
जय पवारांनी शेअर केलेला व्हिडिओ मी पाहिला; हवाई उड्डाणमंत्री मुरलीधर मोहोळांकडून दखल, म्हणाले..
जय पवारांनी शेअर केलेला व्हिडिओ मी पाहिला; हवाई उड्डाणमंत्री मुरलीधर मोहोळांकडून दखल, म्हणाले..
इस्त्रायलच्या हल्ल्यात खामेनींचं निधन; पाकिस्तानी अँकर ढसाढला रडली, म्हणाली 'माझी मुलं अन्...'
इस्त्रायलच्या हल्ल्यात खामेनींचं निधन; पाकिस्तानी अँकर ढसाढला रडली, म्हणाली 'माझी मुलं अन्...'
बीडमध्ये भीषण अपघात, धुळवड साजरी करायला निघालेल्या कारच्या कोलांटउड्या; 1 ठार तीन जखमी
बीडमध्ये भीषण अपघात, धुळवड साजरी करायला निघालेल्या कारच्या कोलांटउड्या; 1 ठार तीन जखमी
BLOG : सीएम विरुद्ध जेएम : वेगळा पॅटर्न... राजकीय सत्तेविरुद्ध लोकशक्तीचा प्रयोग
BLOG : सीएम विरुद्ध जेएम : वेगळा पॅटर्न... राजकीय सत्तेविरुद्ध लोकशक्तीचा प्रयोग
Embed widget