एक्स्प्लोर

IND vs PAK T20 World Cup 2026 : टी-20 विश्वचषकात भारत अन् पाकिस्तान पुन्हा आमनेसामने?, जाणून घ्या संपूर्ण समीकरण

IND vs PAK Final Scenario T20 World Cup 2026 : 2026 च्या टी-20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा महामुकाबल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

IND vs PAK Final Scenario T20 World Cup 2026 : 2026 च्या टी-20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा महामुकाबल्याची शक्यता निर्माण झाली आहे. या स्पर्धेत पुन्हा भारत विरुद्ध पाकिस्तान असा थरार पाहायला मिळेल का? आता याचे उत्तर पाकिस्तानच्या कामगिरीवर अवलंबून आहे. सध्या, पाकिस्तान सुपर-8 गटात तिसऱ्या स्थानावर आहे आणि 28 फेब्रुवारी रोजी पल्लेकेले येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणारा त्यांचा श्रीलंकेविरुद्धचा सामना 'करो या मरो' असा असेल. सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी पाकिस्तानला श्रीलंकेला किमान 65 धावांनी पराभूत करावं लागेल किंवा दिलेलं लक्ष्य 13 षटकांच्या आत गाठावं लागेल. तेव्हाच त्यांना न्यूझीलंडला मागे टाकता येईल.

जर पाकिस्तानने हे कठीण कोड पूर्ण केलं, तर स्पर्धेत पुन्हा एकदा भारताशी त्यांची टक्कर होण्याची शक्यता निर्माण होईल. दोन्ही संघ याआधी गट टप्प्यात आमनेसामने आले होते. त्या सामन्यात भारताने शानदार विजय मिळवला होता. ईशान किशनच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने पाकिस्तानचा 61 धावांनी पराभव केला होता.

नॉकआउटमध्ये भारत-पाकिस्तान आमनेसामने? (India vs Pakistan T20 World Cup final Scenario)

पहिलं समीकरण असं आहे की, पाकिस्तान सुपर-8 मध्ये दुसऱ्या स्थानावर राहून उपांत्य फेरीत पोहोचला आणि भारत आपल्या गटात अव्वल राहिला, तर उपांत्य फेरीत दोन्ही संघांची गाठ पडू शकते. ही शक्यता कमी असली तरी क्रिकेटमध्ये काहीही अशक्य नसतं.

दुसरं आणि अधिक रोमांचक समीकरण म्हणजे... दोन्ही संघांनी आपापले उपांत्य सामने जिंकले, तर अंतिम फेरीत पुन्हा एकदा जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा रंगू शकते. भारत-पाकिस्तान अंतिम सामना म्हणजे चाहत्यांसाठी पर्वणीच ठरेल.

पाकिस्तानसमोर मोठं आव्हान (Pakistan Semi-Final Qualification Scenario)

सध्या पाकिस्तानची स्थिती नाजूक आहे. सुपर-8 च्या गट-2 मध्ये दोन सामन्यांत एक गुणांसह ते तिसऱ्या स्थानावर आहेत, तर न्यूझीलंड तीन सामन्यांत तीन गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. श्रीलंका स्पर्धेबाहेर गेली असली तरी पाकिस्तानच्या स्वप्नांवर पाणी फेरण्याची ताकद त्यांच्यात आहे. आता साऱ्या क्रिकेटविश्वाची नजर पल्लेकेलेतील या निर्णायक सामन्याकडे लागली आहे. पाकिस्तान चमत्कार घडवून सेमीफायनलचं तिकीट मिळवणार का? याचं उत्तर मैदानावरच मिळणार आहे.

हे ही वाचा -

IND vs WI T20 World Cup 2026 : कोलकाताच्या ईडनवर वेस्ट इंडिजसमोर भारताचा भूतकाळ काय सांगतो? हा एक ट्विस्ट ठरवणार अंतिम चारचं भविष्य

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pat Cummins : बेस्ट टीम मैदानात उतरवल्यानंतरही घरच्या मैदानावर बांगलादेशकडून पराभव, पॅट कमिन्सनं पराभवाचं खापर कोणावर फोडलं?  
बांगलादेशनं 23 वर्षात जे जमलं नाही ते करुन दाखवलं, पॅट कमिन्सनं पराभवाचं खापर कोणावर फोडलं?
Aus vs Ban 1st Test : बांगलादेशनं ऑस्ट्रेलियाची घरच्या मैदानावर लाज काढली, दिग्गज पाँटिंग-हेडन संतापले; टीमला नको नको ते बोलले
बांगलादेशनं ऑस्ट्रेलियाची घरच्या मैदानावर लाज काढली, दिग्गज पाँटिंग-हेडन संतापले; टीमला नको नको ते बोलले
IND vs SL 1st Test DAY-2 : पडिक्कलच्या शतकाने भारताचा डाव सावरला, पण शेवटी श्रीलंकेचा पलटवार; 460/9 वर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला!
पडिक्कलच्या शतकाने भारताचा डाव सावरला, पण शेवटी श्रीलंकेचा पलटवार; 460/9 वर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget