एक्स्प्लोर
'तुमच्याच कमेंटची कमी होती काका', पार्थिवचं युवी-हरभजनला उत्तर!

मुंबई: माजी क्रिकेटर अनिल कुंबळेने आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत एक फोटो ट्विटरवर शेअर केला. त्यावेळेस सचिन, सौरव आणि राहुल हे देखील होते. पण यामध्ये एक असा चेहरा होता जो भज्जी आणि युवीला आजही बच्चा वाटतो.
नेहमीच खट्याळ ट्वीट करणाऱ्या भज्जीनं हा फोटो पाहताच ट्वीट केलं "पार्थिव पटेलला पाहा चुजे सारखा दिसतोय" तेच युवराजनं भज्जीला सपोर्ट करत एक ट्वीट केलं. यानंतर पार्थिव पटेलनं असं काही ट्वीट केलं की, त्यानं या दोघांची बोलतीच बंद झाली. "तुमच्याच कमेंटची कमी होती चाचाजी" असं पार्थिवनं ट्वीट केलं.
पार्थिवनं कोणत्याही इमोजीचा वापरल्या नाही. त्यामुळे त्याला राग आला आहे की तो मस्करी करतो. हे समजू शकलं नाही. तसंही खेळाडूंमध्ये मजा मस्करी सुरुच असते. त्यामुळे हा देखील असाच प्रकार असावा.
आणखी वाचा
Advertisement
Advertisement


















