एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
स्पॉट फिक्सिंगप्रकरणी शरजील खानवर पाच वर्षांची बंदी
स्पॉट फिक्सिंगप्रकरणी आणखी एका पाकिस्तानी फलंदाजावर आता कारवाई करण्यात आली आहे.
कराची : पाकिस्तानी फलंदाज शरजील खानवर स्पॉट फिक्सिंगप्रकरणी पीसीबीनं पाच वर्षांची बंदी घातली आहे. पाकिस्तान सुपर लीगमध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरणात त्याची भूमिका संशयास्पद असल्याचं समोर आल्यानंतर त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
शरजीलनं पाच नियमांचं उल्लघन केल्यानं पीसीबीच्या एका समितीनं त्याच्यावर ही बंदी घातली आहे. पण त्याची ही शिक्षा दोन टप्प्यांमध्ये असणार आहे. येत्या अडीच वर्षात शरजीलला कोणतेही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सामने खेळता येणार नाही. 10 फेब्रुवारी 2017 पासून ही बंदी लागू करण्यात आली आहे. पण पीसीबीच्या काही अटी व नियमांचं पालन केल्यास तो 30 महिन्यानंतर पुन्हा मैदानात परतू शकेल.
लाहोर हायकोर्टचे माजी न्यायाधीश असगर हैदर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. या समितीनं शरजीलला ही शिक्षा सुनावली. शरजीलसोबतच खालिद लतीफ याचं देखील स्पॉट फिक्सिंगमध्ये नाव समोर आलं होतं. त्यानंतर या दोघांनाही तात्काळ दुबईहून पाकिस्तानला पाठवण्यात आलं होतं.
28 वर्षीय शरजील खान पाकिस्तानकडून एक कसोटी, 25 वनडे आणि 15 टी-20 सामने खेळला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भंडारा
भविष्य
महाराष्ट्र
Advertisement