एक्स्प्लोर
भारतीय महिला वेटलिफ्टर सैखोम मीराबाई चानू रिओ ऑलिम्पिकमधून बाहेर
रिओ दी जनैरो : भारतीय महिला वेटलिफ्टर सैखोम मीराबाई चानू रिओ ऑलिम्पिकमधून बाहेर पडली आहे. शनिवारी झालेल्या 48 किलो वजनी गटातील वेटलिफ्टिंग स्पर्धेत तिला पराभव स्विकारावा लागला आहे. मीराबाईने स्नॅच स्पर्धेत समाधानकारक होती. क्लीन अँड जर्कमध्ये तिला पदक मिळण्याची शक्यता होती. पण क्लीन अँड जर्कच्या तिन्ही प्रयत्नात तिला यश मिळाले नाही.
स्नॅच स्पर्धेत मीराबाईने दुसऱ्या प्रयत्नात आपले सर्वाधिक 82 किलोग्रॅम वजन उचललं. पण तिसऱ्या प्रयत्नात ती 84 किलो वजन उचलू शकली नाही. तसेच क्लीन अँड जर्कमध्ये 104 किलो वजन उचलण्यात तिला अपयश आले आणि पुढील 2 प्रयत्नातही ती 106 किलो वजन ती उचलू शकली नाही. त्यामुळे मीराबाई स्पर्धेतून बाहेर पडली.
मीराबाई 12 स्पर्धकांमध्ये 11व्या स्थानावर होती. या स्पर्धेत थायलँडच्या सोपिता तानसानने सुवर्ण पदक पटकावलं असून इंडोनेशियाच्या श्री वाह्यूनी ऑगस्टियानी आणि जपानच्या हिरोमी मियाके यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदक पटकावलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement