एक्स्प्लोर
मलिंगा मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात, मात्र नव्या भूमिकेत
गेल्या आयपीएल मोसमात मलिंगाने मुंबई इंडियन्सचंच प्रतिनिधित्व केलं होतं.
मुंबई : यंदाच्या आयपीएल लिलावात अनसोल्ड राहिलेला श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज लसिथ मलिंगाला अखेर खरेदीदार मिळाला आहे. मुंबई इंडियन्सने गोलंदाजी मेंटॉर म्हणून लसिथ मलिंगाला करारबद्ध केलं आहे. गेल्या आयपीएल मोसमात मलिंगाने मुंबई इंडियन्सचंच प्रतिनिधित्व केलं होतं.
मलिंगाने आयपीएलच्या पहिल्या मोसमापासून ते दहाव्या मोसमापर्यंत मुंबई इंडियन्सचं प्रतिनिधित्व केलं. मात्र यंदाच्या मोसमात त्याला एकही खरेदीदार मिळाला नाही. अखेर तो पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच्याच ताफ्यात सहभागी झाला आहे.
मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक महेला जयवर्धने, गोलंदाजी प्रशिक्षक शेन बाँड, गोलंदाजी प्रशिक्षक रॉबिन सिंह आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक जेम्स पेमेंट यांच्या टीममध्ये मलिंगाचाही समावेश झाला आहे.
''मुंबई इंडियन्सचं यापुढेही प्रतिनिधित्व करता येईल हा एक सन्मान आणि चांगली संधी आहे. एक खेळाडू म्हणून मुंबई इंडियन्सकडून खेळण्याचा आनंद घेतला आणि आता नव्या इनिंगला सुरुवात करत आहे,'' असं मलिंगा म्हणाला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
बीड
भारत
नागपूर
Advertisement