Shivam Dube Tested Covid-19 Positive: मुंबईचा स्टार ऑलराऊंडर शिवम दुबे कोरोना पॉझिटिव्ह
Shivam Dube Tested Covid-19 Positive: शिवमच्या जागी साईराज पटेलचा मुंबई संघात निवड करण्यात आल्याची माहिती पीटीआयनं सुत्राच्या हवाल्यानं दिलीय.
Shivam Dube Tested Covid-19 Positive: मुंबईचा स्टार ऑलराऊंडर शिवम दुबेची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलीय. शिवम व्यतिरिक्त मुंबईच्या संघाचे व्हिडिओ अॅनालिस्ट हे देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. शिवमच्या जागी साईराज पटेलचा मुंबई संघात निवड करण्यात आल्याची माहिती पीटीआयनं सुत्राच्या हवाल्यानं दिलीय. रणजी ट्रॉफीच्या पार्श्वभूमीवर शिवम दुबेच्या रुपात मुंबईच्या संघाला मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.
शिवम दुबनं भारताकडून एक एकदिवसीय आणि 13 टी-20 सामने खेळले आहेत. महाराष्ट्र आणि दिल्लीविरुद्धच्या सामन्यांसाठी त्याला मुंबईच्या संघात स्थान देण्यात आलं होतं. भारताचा माजी वेगवान गोलंदाज सलील अंकोला यांच्या अध्यक्षतेखालील वरिष्ठ निवड समीतीनं मुंबईच्या संघाची निवड केली होती. रणजी ट्रॉफीवर 41 वेळा नाव कोरणाऱ्या मुंबईच्या संघानला एलिट गट क मध्ये ठेवण्यात आलंय. मुंबईचे साखळी सामने कोलकातामध्ये खेळवले जाणार आहेत. मुंबईचा संघ आज कोलकात्याला रवाना होणार आहे.
रणजी ट्रॉफी पुढे ढकलण्याची शक्यता
रणजी ट्रॉफीला येत्या 13 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. परंतु, त्यापूर्वीच अनेक संघातील खेळाडूंची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलीय. ही स्पर्धा सुरु होण्यास आता 10 दिवसांपेक्षा कमी कालावधी राहिलाय. सर्व संघांचे संघ आणि कर्णधारांची घोषणा करण्यात आलीय. 6 जानेवारी रोजी बंगाल आणि मुंबई यांच्यात सराव सामनाही होणार आहे. मात्र, या सामन्यावर कोरोनाचं सावट दिसू लागलंय. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता बीसीसीआय या स्पर्धा सुरू होण्यापूर्वी तातडीची बैठक घेऊ शकते. सध्याची परिस्थिती पाहता रणजी ट्रॉफी पुढे ढकलण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha