एक्स्प्लोर

Ind vs SA, 2nd Test : Johannesburg कसोटी जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज; 'या' खेळाडूंना संघात स्थान

Ind vs SA Second Test Match Weather : टीम इंडियानं सेन्च्युरियन कसोटी जिंकून दक्षिण आफ्रिका दौऱ्याची दणक्यात सुरुवात केली. या विजयानंतर आता भारतीय संघाला वेध लागले आहेत ते ऐतिहासिक मालिकाविजयाचे.

Ind vs SA Second Test Match Weather : भारत आणि दक्षिण आफ्रिका (Ind vs SA) मध्ये कसोटी मालिकेतील (Test Series) दुसरा कसोटी सामना सोमवारपासून जोहान्सबर्ग (Johannesburg) च्या वांडरर्स मैदानावर खेळवण्यात येणार आहे. सामना भारतीय वेळेनुसार, दुपारी दीड वाजता वाजता सुरु होईल. तीन सामन्यांच्या या मालिकेत टीम इंडिया (Team India) 1-0 नं पुढे आहे. विराट कोहलीच्या नेतृत्त्वात टीम इंडिया सेंच्युरियन (Centurion) मध्ये खेळवण्यात आलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात 113 धावांनी विजय मिळवला होता. सध्या टीम इंडियाची नजर दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवण्यावर आहे. टीम इंडियानं आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेत एकही कसोटी सामना जिंकलेला नाही. 

दरम्यान, या सामन्यावर पावसाचं सावट असल्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी हवामानाचा अंदाज चांगला नाही. Weather.com नुसार, सोमवारी दुपारी जोहान्सबर्गमध्ये पावसाची 50 टक्के शक्यता आहे. येथील तापमान 14 ते 26 अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते.

भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात तीन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. ज्यातील पहिला कसोटी सामना भारताने जिंकला आहे. सामन्यात भारताकडून केएल राहुलचं शतक आणि मोहम्मद शमीच्या 8 विकेट्स महत्त्वपूर्ण ठरल्या. त्यानंतर आता दुसऱ्या सामन्यात भारत कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. दुसरा सामना सोमवारी (3 जानेवारी) भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरु होणार आहे.

भारताला इतिहास रचण्याची संधी 

भारतीय क्रिकेट संघाने 90 च्या दशकात पहिली कसोटी मॅच दक्षिण आफ्रिकेत खेळली होती. तेव्हापासून आतापर्यंत भारताने एकही कसोटी मालिका आफ्रिकेत जिंकलेली नाही. पण सोमवारी सुरु होणारी कसोटी मॅच भारताने जिंकल्यास भारत तीन कसोटी सामन्यांची मालिका 2-0 ने खिशात घालून इतिहास रचेल.

अशी असू शकते टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन : 

विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SL Playing XI : वॉर्म-अप मॅचमध्येच झाला गेम! कर्णधार गिल 3 नामांकित खेळाडूंना बेंचवरच सडवणार?, प्लेइंग-11 मधून OUT, एक तर डेब्यूची वाट बघतोय
वॉर्म-अप मॅचमध्येच झाला गेम! कर्णधार गिल 3 नामांकित खेळाडूंना बेंचवरच सडवणार?, प्लेइंग-11 मधून OUT, एक तर डेब्यूची वाट बघतोय
Bhuvneshwar Kumar 2027 World Cup : 2022 मध्ये खेळला शेवटचा वनडे सामना; आता भुवनेश्वर कुमार 2027 वर्ल्ड कप खेळणार?, म्हणाला, मला कॉल आला तर...
2022 मध्ये खेळला शेवटचा वनडे सामना; आता भुवनेश्वर कुमार 2027 वर्ल्ड कप खेळणार?, म्हणाला, मला कॉल आला तर...
Yuzvendra Chahal : 7 सामन्यांत 15 विकेट्स… गंभीर पाहताय ना? ज्याला टीम इंडियातून बाहेर केलं, तोच आता वर्ल्ड कपच्या रेसमध्ये
7 सामन्यांत 15 विकेट्स… गंभीर पाहताय ना? ज्याला टीम इंडियातून बाहेर केलं, तोच आता वर्ल्ड कपच्या रेसमध्ये
IND vs SL Playing XI 1st Test : सरफराज खानची एन्ट्री अन् समीकरणं बदलली! 'हे' 4 खेळाडू बसणार बेंचवर, श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची खतरनाक Playing 11
सरफराज खानची एन्ट्री अन् समीकरणं बदलली! 'हे' 4 खेळाडू बसणार बेंचवर, श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची खतरनाक Playing 11

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget