एक्स्प्लोर
... म्हणून भारतीय संघात रोहित शर्माऐवजी करुण नायरला संधी
अनेकदा संधी देऊनही वारंवार अपयशी ठरलेल्या रोहित शर्माऐवजी नायरचा समावेश करुन स्वतःला सिद्ध करण्याची संधी निवड समितीने दिली आहे.

नवी दिल्ली : अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. मात्र यामध्ये रोहित शर्माला संधी देण्यात आलेली नाही. त्याच्याऐवजी संघात करुण नायरला स्थान देण्यात आलं आहे. अनेकदा संधी देऊनही वारंवार अपयशी ठरलेल्या रोहित शर्माऐवजी नायरचा समावेश करुन स्वतःला सिद्ध करण्याची संधी निवड समितीने दिली आहे. करुण नायरने रणजी ट्रॉफीमध्ये कर्नाटककडून खेळताना सर्वाधिक 600 पेक्षा जास्त धावा करुन कमबॅक केलं आहे. तर रोहित शर्माला खराब कामगिरीमुळे बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. निवड समितीने हा निर्णय का घेतला याचं उत्तर निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनी दिलं. ''करुण नायर सध्या चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे त्याला संधी देण्याची ही सर्वोत्कृष्ट वेळ होती,'' असं एमएसके प्रसाद म्हणाले. ''भारतीय अ संघात कोणत्याही सिनियर खेळाडूला संधी देण्यात आलेली नाही. मुरली विजय, रिद्धीमान साहा आणि मोहम्मद शमी वेस्ट इंडिज अ विरुद्धचा चार दिवसीय कसोटी सामना खेळतील आणि पुन्हा एसेक्सविरुद्धच्या सराव सामन्यातही सहभाग घेतील. याबाबत विराट कोहली, रवी शास्त्री आणि राहुल द्रविड यांच्यासोबतही चर्चा करण्यात आली,'' अशी माहिती एमएसके प्रसाद यांनी दिली. जाडेजा, अश्विनला का वगळलं? रवींद्र जाडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांना इंग्लंडविरुद्धच्या वन डे आणि टी-20 मालिकेसाठी संधी देण्यात आलेली नाही. याचं कारणही एमएसके प्रसाद यांनी सांगितलं. ''या अगोदर जाडेजा आणि अश्विनला संधी देण्यात आली नव्हती, तेव्हाच स्पष्ट केलं होतं, की त्यांच्याऐवजी तीन युवा गोलंदाजांना संधी दिली जात आहे. त्यांची (कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल) यशस्वी कामगिरी पाहता त्यांनाच संधी देणं योग्य आहे. प्रत्येक सामन्यात ते कामगिरीमध्ये सुधारणा करत असून मायदेशासह परदेशातही भारताला सामना जिंकून देत आहेत,'' असं एमएसके प्रसाद म्हणाले. संबंधित बातमी :
सिद्धार्थ कौलला संधी, तीन मालिकांसाठी भारतीय संघ जाहीर
गेलं वर्ष म्हणजे 'आसमान से जमीन तक का सफर' : करुण नायर
आयसीसी कसोटी क्रमवारीत करुण नायर, राहुलची मोठी झेप
स्पेशल रिपोर्ट: करुण नायरचं त्रिशतक, 52 वर्षांनी विक्रम !
ही संधी सोडू नकोस, त्रिशतक नक्कीच ठोकशील: जाडेजा
मृत्यू जवळून पाहिला, मग त्रिशतकाचं ओझं कसलं: करुण नायर
आणखी वाचा























