Mohammed Shami & Sania Mirza Marriage: सानिया मिर्झा अन् मोहम्मद शमी लग्न करणार? टेनिसपटूच्या वडिलांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Mohammed Shami & Sania Mirza Marriage: मोहम्मद शमी आणि टेनिसपटू सानिया मिर्झा यांच्या लग्नाबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहेत.
Mohammed Shami & Sania Mirza Marriage T20 World Cup 2024: गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) आणि टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) यांच्या लग्नाबाबत चर्चा सुरु आहेत. मोहम्मद शमी आणि सानिया मिर्झा आपापल्या जोडीदारापासून विभक्त झाले आहेत. त्यामुळे दोघंही लग्न करुन नवीन सुरुवात करणार असल्याचं सांगितलं जात आहे.
सानिया मिर्झाचे वडील इम्रान मिर्झा यांनी या विषयावर प्रतिक्रिया दिली असून लग्नाबाबत व्हायरल होणारं वृत्त खोटं असल्याचं म्हटलं आहे. इम्रान मिर्झा यांनी एका मीडिया मुलाखतीत सांगितले की, सानिया मोहम्मद शमीला कधी भेटली नाही. हा सगळा मूर्खपणा असल्याचं इम्रान मिर्झा यांनी सांगितले.
सानिया मिर्झा हज यात्रेला गेली होती-
काही दिवसांपूर्वी सानिया मिर्झाने सोशल मीडियाच्या माध्यमातून ती हज यात्रेला जात असल्याचे सांगितले होते. सानियाने अलिकडेच सोशल मीडियावर एक पोस्ट लिहीली. ज्यामध्ये तिने तिच्या हज यात्रेचा अनुभव सामायिक केला. तसेच, झालेल्या "चुकीबद्दल" क्षमा मागितली आणि तिच्या आयुष्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
5 महिन्यांपूर्वी शोएब मलिकसोबत घटस्फोट-
जवळपास 5 महिन्यांपूर्वी तिने माजी पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकला घटस्फोट दिला होता. शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न केले. त्याचे हे तिसरे लग्न आहे. २०१० मध्ये सानिया आणि शोएबचे लग्न झाले होते. या दोघांचे नाते सुमारे १४ वर्ष टिकले. शोएब आणि सानिया यांच्या नात्यात दोन वर्षांपासून हळूहळू दुरावा येण्यास सुरूवात झाल्याच्या चर्चा होत्या. एका मॉडेलसोबतचे स्विमिंग पूल मधील इंटिमेट फोटोशूट याला कारणीभूत ठरले होते. त्यानंतर सानिया-शोएब वेगळे होणार अशी सातत्याने चर्चा होती. त्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला.
मोहम्मद शमी दुखापतग्रस्त-
दुसरीकडे, जर आपण मोहम्मद शमीबद्दल बोललो तर तो अनेक महिन्यांपासून दुखापतग्रस्त आहे. परंतु नुकताच तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये घाम गाळताना दिसला. शमीचे वैवाहिक जीवन उद्ध्वस्त झाले आहे कारण हसीन जहाँसोबत त्याचे घटस्फोटाचे प्रकरण अजूनही सुरू आहे. ते वेगळे राहत आहेत, परंतु अद्याप कायदेशीररित्या घटस्फोट घेतलेले नाहीत.