वारी... मुंबई ते शिर्डी पदयात्रा, API ने 230 किमी अंतर कापलं; साईदर्शन 10 किमीवर असतानाच दुर्दैवी मृत्यू
अंधेरी पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे सहाय्यक फौजदार प्रफुल सुर्वे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी निधन झाले. मुंबई ते शिर्डी पायी यात्रेदरम्यान आज सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला
मुंबई : नव्या वर्षाचा संकल्प करत अनेकांनी पहिल्या दिवसाची सुरुवात देवदर्शनाने केली. नववर्षाच्या पहिल्या दिवशी शिर्डी साईबाबांच्या (Shirdi) दर्शनाला मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळलं. तर, नवीन वर्षातील पहिल्याच महिन्यात मुंबईहून शिर्डी साईबाबाच्या दर्शनासाठी पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. या पदयात्रेत सहभागी झालेल्या पोलीस (Police) सहायक फौजदाराचा ह्रदयविकारच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. प्रफुल सुर्वे असे या पोलीस सहाय्यक फौजदाराचे नाव असून ते अंधेरी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. विशेष म्हणजे शिर्डीचं अंतर केवळ 10 किमी दूर असतानाच त्यांचे पायी यात्रेतच दुर्दैवी निधन झाले.
अंधेरी पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे सहाय्यक फौजदार प्रफुल सुर्वे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी निधन झाले. मुंबई ते शिर्डी पायी यात्रेदरम्यान आज सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला, तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुर्वे हे दरवर्षी अंधेरी ते शिर्डी पायी चालत जात असे. यंदाही आपली नियमित पायी वारी करण्यासाठी ते यात्रेत सहभागी झाले होते. विशेष म्हणजे मुंबई ते शिर्डी 240 किमी अंतर आहे. हे अंतर कापताना त्यांनी तब्बल 230 किमीपर्यंत पायी प्रवास केला. शिर्डीला पोहोचण्यासाठी अवघे 10 किलोमीटरचे अंतर बाकी असतानाच सुर्वें यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सुर्वे यांच्या निधनाने साई पालखी मंडळ आणि पोलीस दलावर शोककळा पसरली असून त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
हेही वाचा
मी फाटक्या तोंडाचा म्हणून खा. विशाल पाटील निघून गेले; सांगलीतील सभेत नितेश राणेंची हिंदू गर्जना