एक्स्प्लोर
Sam Konstas Salary : विराटशी पंगा घेणाऱ्या 19 वर्षीच्या पोरांचा पगार कोटींनी वाढला! एका सामन्यासाठी घेणार इतके पैसे? वाचून थक्क व्हाल!
ऑस्ट्रेलियाचा 19 वर्षीय खेळाडू सॅम कॉन्स्टास बॉर्डर-गावसकर ट्रॉफीदरम्यान प्रसिद्धीच्या झोतात आला होता.

Sam Konstas Salary
1/7

ऑस्ट्रेलियाचा 19 वर्षीय खेळाडू सॅम कॉन्स्टास बॉर्डर-गावसकर ट्रॉफीदरम्यान प्रसिद्धीच्या झोतात आला होता. मेलबर्न कसोटीत त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. कारकिर्दीतील पहिल्या डावात त्याने 60 धावांची धडाकेबाज खेळी खेळून खळबळ उडवून दिली.
2/7

याशिवाय त्याने विराट कोहलीशी पंगा घेतल्यानंतर तो जास्त चर्चेत आला. त्यानंतर शेवटच्या सिडनी कसोटीत तो जसप्रीत बुमराहशी भिडला. दरम्यान, एक नवीन अपडेटसमोर आली आहे, ज्यामध्ये त्याच्या पगार कोटींनी वाढला आहे.
3/7

वर्ल्ड क्रिकेटमध्ये त्याची वाढती लोकप्रियता पाहता सॅम कॉन्स्टासच्या पगारात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इनसाइड स्पोर्टनुसार, श्रीलंकेविरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी कॉन्स्टासची निवड झाल्यास त्याला सुमारे 1.87 कोटी रुपयांचा बोनस मिळू शकतो.
4/7

दरम्यान, कारकिर्दीतील तिसरा कसोटी सामना खेळल्यानंतर कॉन्स्टास ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाकडून केंद्रीय करार मिळविण्यासाठी पात्र ठरेल. केंद्रीय करार मिळाल्यावर, कॉन्स्टासचे वार्षिक वेतन सुमारे 2.88 कोटी रुपये असेल.
5/7

बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या 2 सामन्यात कॉन्स्टासने 113 धावा केल्या. भारताविरुद्ध पदार्पण करण्यापूर्वी सॅम कॉन्स्टास बिग बॅश लीगमध्ये सिडनी थंडरकडून खेळत होता.
6/7

हंगामातील पहिल्याच सामन्यात त्याने केवळ 27 चेंडूत 56 धावांची तुफानी खेळी केली. या खेळीत त्याने 8 चौकार आणि 2 षटकार मारले. दरम्यान, बिग बॅश लीगच्या इतिहासात सिडनी थंडरसाठी सर्वात वेगवान अर्धशतक करणारा तो खेळाडूही ठरला.
7/7

त्याने ॲडलेड स्ट्रायकर्सविरुद्ध अवघ्या 20 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. कॉन्स्टासने पहिल्या सामन्यात 60 धावा केल्या, मात्र त्यानंतर 3 डावात तो काही खास करू शकला नाही.
Published at : 07 Jan 2025 07:51 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
सांगली
सातारा
आयपीएल
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
