T20 World Cup 2024 Team India: वेस्ट इंडिजचा संघ जर विश्वचषकात...; सर विवियन रिचर्ड्स आले, हसवले, मनातले सगळं बोलले, Video
T20 World Cup 2024 Team India: भारतीय संघाच्या विजयानंतर वेस्ट इंडिजचे माजी दिग्गज सर विवियन रिचर्ड्स टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये आले.
T20 World Cup 2024 Team India: टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2024)काल भारताने बांगलादेशचा 50 धावांनी पराभव केला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने सुपर-8 फेरीत सलग दुसरा विजय नोंदवला. यापूर्वी टीम इंडियाने अफगाणिस्तानचा पराभव केला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने 20 षटकांत 5 बाद 196 धावा केल्या. याला प्रत्युत्तर देताना बांगलादेशला 20 षटकांत 8 विकेटच्या मोबदल्यात केवळ 146 धावा करता आल्या.
भारतीय संघाच्या विजयानंतर वेस्ट इंडिजचे माजी दिग्गज सर विवियन रिचर्ड्स (Sir Vivian Richards) टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये आले. यावेळी त्यांनी सूर्यकुमार यादवला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार दिला. तसेच सर विवियन रिचर्ड्स यांनी भारतीय खेळाडूंमध्ये आपले मत व्यक्त केले. सर विवियन रिचर्ड्स म्हणाले की, तुम्ही चांगले क्रिकेट खेळलात, ज्या संघात इतके महान खेळाडू आहेत त्याबद्दल मी काय सांगू? यानंतर ते गंमतीने म्हणाला की, जर वेस्ट इंडिजचा संघ चांगली कामगिरी करत नसेल तर मी भारतीय संघाला पाठिंबा देईन. यानंतर ड्रेसिंग रूममध्ये एकच हशा पिकला.
ऋषभ पंतचे केले कौतुक-
सर विवियन रिचर्ड्स यांनी ऋषभ पंतचेही कौतुक केले. सर विवियन रिचर्ड्स म्हणाले की, त्या अपघातानंतर तुला पुन्हा मैदानात पाहून आनंद झाला. भारतीय संघ ज्या प्रकारे क्रिकेट खेळत आहे ते पाहण्यात आनंद आहे, मी देखील त्याचा आनंद घेत आहे. यानंतर, आपले बोलणे संपवून त्यांनी भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला मिठी मारली. यादरम्यान सर विवियन रिचर्ड्स ऋषभ पंतला पॉकेटमॅन म्हणतात, त्यानंतर पुन्हा सगळे हसतात. तसेच सर विवियन रिचर्ड्स शेवटी म्हणतात की, तुम्हा सर्वांना भविष्यासाठी शुभेच्छा...
भारताच्या ड्रेसिंग रुममधील संपूर्ण व्हिडीओ-
📽️ 𝗗𝗿𝗲𝘀𝘀𝗶𝗻𝗴 𝗥𝗼𝗼𝗺 𝗕𝗧𝗦 | 𝗜𝗻𝗱𝗶𝗮 𝘃𝘀 𝗕𝗮𝗻𝗴𝗹𝗮𝗱𝗲𝘀𝗵
— BCCI (@BCCI) June 23, 2024
At the Sir Vivian Richards Stadium, it is the legend himself who presented the fielder of the match medal! 🏅
WATCH 🎥🔽 - By @RajalArora | #T20WorldCup | #TeamIndia | #INDvBAN | @ivivianrichards
अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला लोळवलं-
टी-20 विश्वचषकात आज मोठा उलटफेर झाला आहे. ऑस्ट्रेलियाला अफगाणिस्ताननं (AUS vs AFG) 21 धावांनी पराभूत करत इतिहास रचला आहे. अफगाणिस्ताननं पहिल्यांदा फलंदाजी करताना 6 विकेटवर 148 धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया 127 धावांपर्यंत मजल मारू शकली. अफगाणिस्तानपुढं ग्लेन मॅक्सवेलनं एकाकी झुंज दिली मात्र त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही.