एक्स्प्लोर

Santosh Deshmukh Case : पप्पा... जिथे असाल तिथे हसत रहा, आम्हाला माफ करा, तुम्हाला वाचवू शकलो नाही; संतोष देशमुखांच्या लेकीला अश्रू अनावर

Santosh Deshmukh Case : जालन्यातील जनआक्रोश मोर्चात संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिला अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले.

जालना : बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या (Santosh Deshmukh Murder Case) प्रकरणाने राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात केज पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल आहे. तर मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडवर (Walmik Karad) खंडणीचा गुन्हा करण्यात आला आहे. या प्रकरणात धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी जोर धरत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यात ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत. आज जालना (Jalna) येथे मराठा क्रांती मोर्चा (Maratha Kranti Morcha) आणि सकल मराठा समाजाच्या (Sakal Maratha Samaj) वतीने जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात बोलत संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुखला अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले. 

वैभवी देशमुख म्हणाली की, आज आमचा आनंद आमच्यापासून फिरवून घेतला आहे. तुमच्या पाठिंब्यामुळेच आज आम्ही उभे राहू शकलो, तुमच्यामुळेच आम्ही न्यायाचा लढा पुढे नेऊ शकलो. आपल्याला न्याय मिळवायचा आहे. त्यासाठी तुम्ही मानवतेच्या नात्याने एकत्र येऊन आमच्या कुटुंबीयांच्या पाठीमागे उभे राहिलात तसेच आमच्या पाठीमागे सदैव उभे राहा. 

माझ्या वडिलांना इतका छळ करून का मारले?

तुम्ही सर्वांनी आम्हाला खूप सहकार्य केले आहे. आम्ही ज्या वेळेस रस्त्याने चालतो त्यावेळेस आम्हाला धक्काबुक्की होऊ नये म्हणून तुम्ही लोकांना हात जोडून विनंती केली की आम्हाला चालू द्या. त्यासाठी मी तुमचे आभार मानते. आज आम्हाला फक्त चालताना धक्काबुक्की होत आहे. आम्ही रस्त्याने नीट चालू शकत नाही तरीदेखील तुम्ही आम्हाला सहकार्य करतात. पण माझा एक आरोपींना प्रश्न आहे की, तुम्ही माझ्या वडिलांना इतका छळ करून का मारले? त्यांना त्यावेळेस किती वेदना झाल्या असतील, गावचे उत्तर मला हवे असल्याचे वैभवीने म्हटले.

वैभवीला अश्रू अनावर

मी स्वतःला खूप भाग्यशाली समजते की, मी देशमुख कुटुंबियातील मुलगी आहे. माझ्या आई वडिलांची मी लेक आहे. पप्पा तुम्ही आज जिथे कुठे असाल तिथे हसत रहा, आम्हाला माफ करा की आम्ही तुम्हाला वाचवू शकलो नाही, असे म्हणत वैभवीला अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले.

आणखी वाचा 

Santosh Deshmukh Case: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण; खासदार बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्याने मानव अधिकार आयोगात गुन्हा दाखल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raigad Guardian Minister : तटकरेंनी पाठीत पुन्हा खंजीर खुपसला; रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत वादाचा वणवा
तटकरेंनी पाठीत पुन्हा खंजीर खुपसला; रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत वादाचा वणवा
MUM Vs J&K Ranji Trophy : मुंबई 120 धावांवर ऑल आउट! गंभीरने चॅम्पियन ट्रॉफीतून फुली मारलेल्या पठ्ठ्याने घातला धुमाकूळ, ठोकले अर्धशतक
मुंबई 120 धावांवर ऑल आउट! गंभीरने चॅम्पियन ट्रॉफीतून फुली मारलेल्या पठ्ठ्याने घातला धुमाकूळ, ठोकले अर्धशतक
Ranji Trophy : 6 फूट 4 इंच उंचीचा कोण उमर नझीर? ज्याने एक-एक रन काढण्यासाठी रोहित शर्माला अक्षरशः रडवले, पाहा VIDEO
6 फूट 4 इंच उंचीचा कोण उमर नझीर? ज्याने एक-एक रन काढण्यासाठी रोहित शर्माला अक्षरशः रडवले, पाहा VIDEO
रेल्वे अपघातापूर्वी नातवाला व्हिडिओ कॉल, पण 10 वर्षांपासून भेट नव्हती; आजीसह कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
रेल्वे अपघातापूर्वी नातवाला व्हिडिओ कॉल, पण 10 वर्षांपासून भेट नव्हती; आजीसह कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Nashik Tour : राज ठाकरे नाशिकमध्ये दाखल, ३ दिवस दौरा, कार्यकर्त्यांशी साधणार संंवादABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 23 January 2025 दुपारी १ च्या हेडलाईन्सSanjay Raut Mumbai : 'ढोंग बंद करा, बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्या', राऊतांचं शाहांना आव्हानPune Crime : कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या,पुण्यात कौर्याची परिसीमा,खून केल्यावर व्हिडीओ चित्रीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Guardian Minister : तटकरेंनी पाठीत पुन्हा खंजीर खुपसला; रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत वादाचा वणवा
तटकरेंनी पाठीत पुन्हा खंजीर खुपसला; रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत वादाचा वणवा
MUM Vs J&K Ranji Trophy : मुंबई 120 धावांवर ऑल आउट! गंभीरने चॅम्पियन ट्रॉफीतून फुली मारलेल्या पठ्ठ्याने घातला धुमाकूळ, ठोकले अर्धशतक
मुंबई 120 धावांवर ऑल आउट! गंभीरने चॅम्पियन ट्रॉफीतून फुली मारलेल्या पठ्ठ्याने घातला धुमाकूळ, ठोकले अर्धशतक
Ranji Trophy : 6 फूट 4 इंच उंचीचा कोण उमर नझीर? ज्याने एक-एक रन काढण्यासाठी रोहित शर्माला अक्षरशः रडवले, पाहा VIDEO
6 फूट 4 इंच उंचीचा कोण उमर नझीर? ज्याने एक-एक रन काढण्यासाठी रोहित शर्माला अक्षरशः रडवले, पाहा VIDEO
रेल्वे अपघातापूर्वी नातवाला व्हिडिओ कॉल, पण 10 वर्षांपासून भेट नव्हती; आजीसह कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
रेल्वे अपघातापूर्वी नातवाला व्हिडिओ कॉल, पण 10 वर्षांपासून भेट नव्हती; आजीसह कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
Rohit Pawar : शरद पवार-अजितदादा पुन्हा एकत्र येणार? रोहित पवारांच्या 'त्या' वक्तव्यानं भुवया उंचावल्या!
शरद पवार-अजितदादा पुन्हा एकत्र येणार? रोहित पवारांच्या 'त्या' वक्तव्यानं भुवया उंचावल्या!
बांग्लादेशी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ, कामाठीपुरातून 5 जणांना अटक; क्राइम ब्रँचकडून तपास
बांग्लादेशी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ, कामाठीपुरातून 5 जणांना अटक; क्राइम ब्रँचकडून तपास
Shani Asta 2025 : पुढचे 37 दिवस शनि होणार अस्त; 3 राशींवर कोसळणार संकटांचा डोंगर, आरोग्य आणि आर्थिक स्थितीसह सर्वच ढासळणार
पुढचे 37 दिवस शनि होणार अस्त; 3 राशींवर कोसळणार संकटांचा डोंगर, आरोग्य आणि आर्थिक स्थितीसह सर्वच ढासळणार
Nitesh Rane : कॉलर टाईट करा, पीर-बीर बाबांना विचारू नका, नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य, सैफ अली खानच्या हल्ल्यावरही संशय, बावनकुळे म्हणाले...
कॉलर टाईट करा, पीर-बीर बाबांना विचारू नका, नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य, सैफ अली खानच्या हल्ल्यावरही संशय, बावनकुळे म्हणाले...
Embed widget