Yuzvendra Chahal : लग्न नेमकं कोणामुळं मोडतंय? धनश्री प्रतीकसोबत दिसली, दुसरीकडे युझवेंद्र चहलही मिस्ट्री गर्लसोबत चेहरा लपवताना झाला स्पॉट!
Yuzvendra Chahal and Dhanashree Verma: युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा सध्या चांगलेच चर्चेत आहेत. दोघांचा लवकरच घटस्फोट होणार असल्याच्या बातम्या सध्या सुरू आहेत.
Yuzvendra Chahal and Dhanashree Verma: क्रिकेटर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि धनश्री वर्मा (Dhanashree Verma) यांच्या वैवाहिक जीवनाबाबतच्या अनेक चर्चा सध्या माध्यमांमध्ये दिसून येत आहेत. युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि धनश्री वर्मा (Dhanashree Verma) लवकरच घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलोही केले त्यानंतर या चर्चांना मोठ्या प्रमाणावर उधाण आलं आहे. युजवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) धनश्रीसोबतचे (Dhanashree Verma) फोटोही त्याच्या सोशल मिडियवरून हटवले आहेत. मात्र, दोघांनीही या वृत्तांवर आतापर्यंत मौन बाळगले आहे. त्यांचे वैवाहिक जीवनात काही अडचणी आणि नात्यात दुरावा आल्याच्या अनेक प्रकारच्या बातम्या समोर येत आहेत.
धनश्रीचा कोरिओग्राफर प्रतीक उतेकरसोबतचा फोटो व्हायरल
धनश्रीचा (Dhanashree Verma) कोरिओग्राफर प्रतीक उतेकरसोबतचा एक फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये प्रतीक धनश्रीला मागून पकडून पोज देताना दिसतो आहे. तर धनश्री (Dhanashree Verma) लाजताना दिसते. हा फोटो यापूर्वीही व्हायरल झाला होता. त्यावेळी धनश्रीला खूप ट्रोल करण्यात आले होते. तिने तिच्या ट्रोलरला देखील चांगलेच उत्तर दिले होते. आता देखील धनश्री (Dhanashree Verma) आणि प्रतीक उतेकर यांचे नाव जोडले जात आहे, तर दुसरीकडे संसार मोडण्याला तिला जबाबदार धरण्यात येतंय.
दरम्यान धनश्री (Dhanashree Verma) आपल्या ट्रोलरला उत्तर देताना म्हणाली होती, 'मला कधीच ट्रोल्सचा त्रास झाला नाही, पण यावेळी मला अडचणींचा सामना करावा लागत आहे. कारण माझे कुटुंब काळजीत आहे. तुम्हा लोकांना विनंती आहे की, तुम्ही थोडेसे संवेदनशील व्हा आणि तुम्ही टॅलेंटवर लक्ष द्या. आम्ही तुमचे मनोरंजन करण्यासाठी येथे आहोत. मी एक स्त्री आहे, हे असं माझ्यासाठी योग्य नाही. मी एक फायटर आहे आणि हार मानणार नाही'.
युजवेंद्र मिस्ट्री गर्लसोबत झाला स्पॉट
एकीकडे चाहते धनश्रीला (Dhanashree Verma) ट्रोल करत आहेत, त्याचवेळी नुकताच युजवेंद्र चहल एका मिस्ट्री गर्लसोबत दिसून आला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये युजवेंद्र एका मुलीसोबत दिसत होता. मिस्ट्री गर्लने हिरव्या रंगाचा ड्रेस घातला होता. तर युजवेंद्र चहल कॅमेराकडे पाहून आपला चेहरा लपवताना दिसला. युजवेंद्रसोबत दिसलेली मुलगी कोण याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र आता धनश्री-युझवेंद्र यांचं लग्न नेमकं कोणामुळे मोडलं अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
View this post on Instagram