जपानच्या नाओमी ओसाकाला ऑस्ट्रेलियन ओपनचं विजेतेपद
नाओमीचं हे सलग दुसरं ग्रॅन्डस्लॅम आहे. तिने गेल्यावर्षी शेवटचं ग्रॅन्डस्लॅम आणि यावर्षीच्या पहिल्या ग्रॅन्डस्लॅमवर कब्जा केला आहे. ऑस्ट्रेलियन ओपनचा खिताब आपल्या नावे केल्याने नाओमी सोमवारी जारी होणाऱ्या महिला टेनिसमध्ये (WTA) अव्वल खेळाडू बनणार आहे.
सिडनी : जपानच्या नाओमी ओसाकानं अमेरिकन ओपनपाठोपाठ ऑस्ट्रेलियन ओपनच्या विजेतेपदावरही आपलं नाव कोरलं आहे. ओसाकानं आजवरच्या कारकीर्दीत पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन ओपनचं विजेतेपद पटकावलं.
नाओमीनं महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात चेक प्रजासत्ताकच्या पेट्रो क्वितोव्हाचं आव्हान 7-6, 5-7, 6-4 असं मोडून काढलं. ऑस्ट्रेलियन ओपनच्या विजेतेपदानं ओसाकाला जागतिक क्रमवारीतला 'नंबर वन'ही मिळवून दिला. आंतराष्ट्रीय टेनिसच्या इतिहासात अमेरिकन आणि ऑस्ट्रेलियन ओपनची विजेतीपदं लागोपाठ जिंकणारी ओसाका ही गेल्या चार वर्षांमधली दुसरी महिला टेनिसपटू ठरली. याआधी सेरेना विल्यम्सनं २०१५ साली ही कामगिरी बजावली होती. विशेष म्हणजे नाओमीनं सेरेना विल्यम्सलाच हरवून अमेरिकन ओपनचं विजेतेपद पटकावलं होतं.