IPL 2022 : David Warner हैदराबादमध्ये परतणार? संघाच्या ट्वीटमुळे चर्चेला उधाण
SRH Twitter: सनरायजर्स हैदराबाद (SRH) संघाने आयपीएलच्या मागील पर्वात माजी कर्णधार डेव्हिड वॉर्नरला (David Warner) खराब फॉर्ममुळे कर्णधारपदावरुन हटवत संघातही स्थान दिलं नव्हतं.
David Warner News : टी20 विश्वचषकात (T20 WC) आणि त्यानंतर आता अॅशेस मालिकेत शानदार प्रदर्शन करणारा ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (David Warner) आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये कोणत्या संघात असेल? हा मोठा चर्चेचा विषय आहे. यातच आता सनरायजर्स हैदराबाद (SRH) संघाने केलेल्या एका ट्वीटने सर्व प्रकरणात आणखी एक वळण दिलं आहे. मंगळवारी ऑस्ट्रेलिया संघाने यंदाची अॅशेस मालिका खिशात घातल्यानंतर सनरायजर्स संघाने वॉर्नरला शुभेच्छा दिल्या असून यामुळे पुन्हा वॉर्नर आणि हैदराबाद संघाचं जुळणार का? ही चर्चा जोर धरु लागली आहे. दरम्यान याबाबत वॉर्नर किंवा संघाने कोणतचं अधिकृत वक्तव्य केलेलं नाही.
काय आहे सर्व प्रकरण?
अॅशेस मालिकेत (Ashes Test) डेव्हिड वॉर्नरने दमदार फटकेबाजी केली. त्याआधी ऑस्ट्रेलियाला टी-20 विश्वचषक जिंकवतानाही वॉर्नरने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे सध्या वॉर्नर कमालीच्या फॉर्ममध्ये असल्याने यंदाच्या आयपीएलमध्ये अनेक संघांच्या नजरा त्याच्यावर असणार आहेत. याआधी वॉर्नरने एका नेटकऱ्याच्या सनरायजर्स संघाशी संबधित ट्वीटला उत्तर दिलं होतं, ज्यावर संघानेही रिअॅक्ट केलं होतं. त्यात आता वॉर्नरला शुभेच्छा देताना हैदराबादने लिहिलं आहे की, अॅशेस जिंकल्याबद्दल अभिनंदन डेव्ही. असा वाटतंय तू पुन्हा फॉर्ममध्ये आला आहेस. संघासोबत तू आनंद घेत आहेत. तसंच आम्हाला आशा आहे आयपीएल 2022 मध्ये लिलावातही तुला फायदा होईल."
हे देखील वाचा-
- IPL 2022 Mega Auction : बंगळुरुध्ये होणार आयपीएलमधील खेळाडूंचा लिलाव, दिग्गज खेळाडूंवर लागणार बोली
- Centurion Test : रबाडा-एंगिडीच्या नावावर मोठा विक्रम, भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत चमकदार कामगिरी
- IND vs SA 1st Test: तिसऱ्या दिवशीच्या पंतच्या खेळीवर विनोद कांबळीनी उपस्थित केले प्रश्न, म्हणाले...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha