(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Centurion Test : रबाडा-एंगिडीच्या नावावर मोठा विक्रम, भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत चमकदार कामगिरी
IND vs SA 1st Test: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या डावात 327 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी तिसऱ्या दिवशी कसून गोलंदाजी केली.
Lungi Ngidi Kagiso Rabada : दक्षिण आफ्रीका संघातील युवा गोलंदाज लुंगी एंगिडी आणि कागीसो रबाडा यांनी भारतीय संघाचा पहिला डाव तिसऱ्या दिवशी फार कमी वेळात उध्वस्त केला. पहिल्या दिवशी 272 धावांवर 3 बाद असणाऱ्या भारतीय संघाला 327 धावांत गुंडाळलं. यावेळी रबाडा आणि एंगिडी यांनीच सर्वाधिक विकेट्स घेतले. रबाडाने 3 आणि एंगिडीने 6 विकेट्स घेत एक खास रेकॉर्ड नावावर केला. ज्यानंत त्यांनी मोर्ने मोर्कल, जॅक कॅलिस आणि शॉन पोलॉक अशा दिग्गजांनाही मागे टाकलं.
सामन्यात एंगिडीने 24 ओव्हर टाकत 71 रन दिले सोबत 6 विकेटही त्याने खिशात घातले. यावेळी त्याने 5 मेडन ओव्हर देखील टाकले. तर दुसरकीडे रबाडाने 26 ओव्हरमध्ये 72 रन देत 3 विकेट्स घेतले. या प्रदर्शनाच्या जोरावर या दोन्ही खेळाडूंनी सेंचुरियन मैदानात एक खआस रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केलं आहे. सेंचुरियन टेस्टमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत रबाडाने तिसरा क्रमांक पटकावला असन एंगिडी या यादीत 10 व्या स्थानावर पोहोचला आहे.
डेल स्टेन अव्वल
सेंचुरियनच्या मैदानात सर्वाधिक कसोटी विकेट्स दक्षिण आफ्रिकेचा लेजेंड डेल स्टेनच्या नावावर आहे. डेल स्टेनने 20 डावात 59 विकेट्स घेतल्या आहेत. तर तिसऱ्या नंबरवर असणाऱ्या रबाडाने केवळ 11 डावांत 38 विकेट्स घेतल्या आहेत. तर एंगिडीने 5 डावांत 16 विकेट्स घेतल्या आहेत. एंगिडीने पटकावलेल्या या 6 विकेट्स त्याचा सेंचुरियनमधील दुसरा बेस्ट परफॉर्मेंस आहे. याआधी त्याने 2017-18 मध्ये 39 रन देत 6 विकेट घेतले होते.
हे देखील वाचा-
- IND vs SA 1st Test: तिसऱ्या दिवशी भारताचा खराब खेळ, पटापट 7 विकेट गमावल्याने 327 धावांवर पहिला डाव आटोपला
- IND vs SA 1st Test: तिसऱ्या दिवशीच्या पंतच्या खेळीवर विनोद कांबळीनी उपस्थित केले प्रश्न, म्हणाले...
- SA Vs IND ODI Series: एकदिवसीय मालिकेत केएल राहुलला मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता, रोहित शर्मासमोर मोठं आव्हान
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha