(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Riyan Parag: 'सारा अली खान हॉट, अनन्या पांडे हॉट...', रियान परागची यूट्यूब हिस्ट्री लीक
Riyan Parag : आयपीएलमधील धमाकेदार कामगिरीमुळे चर्चेत असणारा रियान आता वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलाय. रियान पराग यूट्यूब हिस्ट्रीवरुन सोशल मीडियावर चर्चेत आहे.
Riyan Parag YouTubes History Leak : राजस्थानच्या रियान परागने आयपीएल 2024 मध्ये शानदार प्रदर्शन केलेय. मध्यक्रममध्ये राजस्थानसाठी रियान परागने खोऱ्याने धावा चोपल्या आहेत. रियान परागने आपल्या शानदार फलंदाजीच्या जोरावर राजस्थानला विजय मिळवून दिलेत. त्याने काही सामन्यात आक्रमक फलंदाजी करत राजस्थानच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. आयपीएलमधील धमाकेदार कामगिरीमुळे चर्चेत असणारा रियान आता वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलाय. रियान पराग यूट्यूब हिस्ट्रीवरुन सोशल मीडियावर चर्चेत आहे. यूट्यूब हिस्ट्रीमुळे रियान पराग वादात अडकण्याची शक्यता आहे.
रियान परागच्या यूट्यूब सर्च हिस्ट्रीमध्ये बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे आणि सारा अली खान यांचं नाव दिसत आहे. ज्याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल झालेय. रियान परागची यूट्यूब सर्च हिस्ट्री बाहेर कशी आली? याचीही चर्चाही सुरु आहे. रियान पराग एक गेमिंग चॅनल तालवते. त्यामध्ये तो लाईव्ह स्ट्रिमिंगही करत असतो. याच लाईव्ह स्टिमिंगदरम्यान रियान पराग यूट्यूबवर कॉपीराइट फ्री म्यूजिक शोधत होता. पण रियान पराग यानं जसं सर्च बॉक्सवर क्लिक केले, त्याचवेळी त्याची यूट्यूब सर्च हिस्ट्री समोर आली. त्यामध्ये सारा अली खान आणि अनन्या पांड्या यांची नावं दिसली. त्यानं 'सारा अली खान हॉट, अनन्या पांडे हॉट...' असं सर्च केल्याचं हिस्ट्रीमध्ये दिसलेय.
रियान पराग वादात अडकण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही तो त्याच्या सोशल मीडिया पोस्ट आणि मैदानावरील काही विचित्र कृतींमुळे वादात सापडला आहे. आयपीएल 2023 चा हंगाम परागसाठी खूप वाईट होता. त्याच्या बॅटमधून अजिबात धावा झाल्या नाहीत, त्यानंतर त्याला खूप ट्रोल करण्यात आले होते.
यूट्यूब हिस्ट्रीचा व्हिडीओ पाहा
Ananya Pandey hot"
— cutter 🔥🔥🔥 (@The_Ruler_of_X) May 27, 2024
"Sara Ali Khan hot"
Riyan parag YT search history 😭#THEDANCEDAY #石井蘭の最強乱舞 #石井蘭 pic.twitter.com/pKicsuyQzM
आयपीएल 2024 मध्ये रियानचा जलवा -
2023 आयपीएलमध्ये फ्लॉप गेलेल्या रियान परागने यंदा मात्र खोऱ्याने धावा चोपल्या. आयपीएल 2024 मध्ये त्यानं शानदार फलंदाजी केली. यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजात रियान पराग तिसऱ्या क्रमांकावर राहिला. रियान परागने 15 सामन्यातील 14 डावात 52 च्या शानदार सरासरीने आणि 150 च्या जबरदस्त स्ट्राईक रेटने 573 धावांचा पाऊस पाडला. यादरम्यान रियान परागने 4 अर्धशतकेही ठोकली. रियान परागने यंदाच्या हंगामात 40 चौकार आणि 33 षटकार ठोकले.