IPL 2022: आयपीएलमध्ये 2000 धावा आणि 100 विकेट घेणारा रवींद्र जडेजा एकमेव खेळाडू
IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला येत्या 26 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या हंगामातील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा संघ कोलकाता नाइट रायडर्ससोबत भिडणार आहे.
IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला येत्या 26 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या हंगामातील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा संघ कोलकाता नाइट रायडर्ससोबत भिडणार आहे. दरम्यान, महेंद्रसिंह धोनीनं कर्णधारपद सोडल्यानंतर रवीद्र जाडेजा चेन्नईच्या संघाचं नेतृत्व करणार आहे. रवींद्र जाडेजानं आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करून दाखवलीय. आयपीएलमध्ये दोन हजारांहून अधिक धावा आणि 100 हून अधिक विकेट्स घेणारा रवींद्र जाडेजा एकमेक खेळाडू आहे.
जाडेजाची आयपीएलमधील कामगिरी
आयपीएलमध्ये रवींद्र जडेजानं आतापर्यंत 200 सामने खेळले आहेत. ज्यात त्यानं 27.11 च्या फलंदाजीच्या सरासरीनं 2 हजार 386 धावा केल्या आहेत. यात दोन अर्धशतकाचा समावेश आहे. आयपीएलमध्ये त्याच्या नावावर 85 षटकार आणि 176 चौकाराची नोंद आहे. जडेजानं आतापर्यंत गोलंदाजीत 30.04 च्या सरासरीनं 127 विकेट्स घेतले आहेत. त्याचा इकॉनॉमी रेट 7.61 राहिला आहे. जडेजानं आयपीएलमध्ये 3 वेळा चार आणि एकदा पाच विकेट्स घेतल्या आहेत.
आयपीएलच्या चौदाव्या हंगामात जाडेजाची उत्कृष्ट खेळी
आयपीएलच्या शेवटच्या मोसमात रवींद्र जडेजाने चांगली कामगिरी केली होती. या हंगामात त्यानं गोलंदाजीनं नव्हेतर फलंदाजीनंही कमाल करून दाखवली आहे. त्यानं 75. 66 च्या सरासरीनं धावा केल्या होत्या. या हंगामातील 16 सामन्यात त्यानं 227 धावा केल्या. तर, 13 विकेट्स घेतल्या आहेत.
रविंद्र जाडेजा चेन्नईचा तिसरा कर्णधार
33 वर्षाचा रवींद्र जाडेजा 2012 मध्ये चेन्नईच्या संघात सामील झाला होता. चेन्नईच्या संघाचं नेतृत्व करणारा रवींद्र जाडेजा तिसरा कर्णधार ठरणार आहे. आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून महेंद्रसिंह धोनीनं चेन्नईचं नेतृत्व केलंय. धोनीच्या नेतृत्वात चेन्नईच्या संघानं 213 पैकी 130 सामने जिंकले आहेत. तर, धोनीच्या गैरहजेरीत सुरेश रैनानं सहा सामन्याचं नेतृत्व केलंय. यातील दोन सामन्यात चेन्नईला विजय मिळवता आलाय.
हे देखील वाचा-
- IPL 2022 : आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा चारहून अधिक विकेट घेणारे गोलंदाज, टॉपवर आहे केकेआरचा खेळाडू
- MS Dhoni Captaincy Record : 'कॅप्टन कूल'शिवाय आयपीएल, पाहा कर्णधार म्हणून कसा आहे धोनीचा विक्रम
- CSK New Captain: महेंद्रसिंह धोनीनं कर्णधारपद सोडलं, हुकमी 'एक्क्या'कडं सोपवली जबाबदारी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha