(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CSK New Captain: महेंद्रसिंह धोनीनं कर्णधारपद सोडलं, हुकमी 'एक्क्या'कडं सोपवली जबाबदारी
CSK New Captain: आयपीएलच्या 15व्या हंगामाला सुरुवात होण्यास अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असताना चेन्नईच्या गोठातून मोठी बातमी आली आहे.
CSK New Captain: आयपीएलच्या 15व्या हंगामाला सुरुवात होण्यास अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असताना चेन्नईच्या गोठातून मोठी बातमी आली आहे. एम. एस. धोनीने चेन्नई संघाचे कर्णधारपद सोडलं आहे. विस्फोटक अष्टपैलू फलंदाज रवींद्र जाडेजाकडे संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. चेन्नई सुपरकिंग्जच्या अधिकृत ट्वीटर खात्यावर याची घोषणा करण्यात आली आहे.
महेंद्रसिंह धोनीनं 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर आयपीएलमध्ये चेन्नईच्या संघाचं नेतृत्व करत होता. याच दरम्यान, महेंद्रसिंह धोनीनं चेन्नईच्या संघाचं कर्णधारपद सोडल्याची माहिती समोर आलीय. आयपीएलच्या पंधराव्या हंगामात रवींद्र जाडेजा चेन्नईच्या संघाचं नेतृत्व करणार आहे.
33 वर्षाचा रवींद्र जाडेजा 2012 मध्ये चेन्नईच्या संघात सामील झाला होता. चेन्नईच्या संघाचं नेतृत्व करणारा रवींद्र जाडेजा तिसरा कर्णधार ठरणार आहे. आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून महेंद्रसिंह धोनीनं चेन्नईचं नेतृत्व केलंय. धोनीच्या नेतृत्वात चेन्नईच्या संघानं 213 पैकी 130 सामने जिंकले आहेत. तर, धोनीच्या गैरहजेरीत सुरेश रैनानं सहा सामन्याचं नेतृत्व केलंय. यातील दोन सामन्यात चेन्नईला विजय मिळवता आलाय.
चेन्नई सुपर किंग्सचे शिलेदार
रवींद्र जाडेजा (16 कोटी), महेंद्रसिंग धोनी (12 कोटी), मोईन अली (8 कोटी), ऋतुराज गायकवाड (6 कोटी), रॉबिन उथाप्पा (2 कोटी), ड्वेन ब्राव्हो (4.40 कोटी), अंबाती रायुडू (6.75 कोटी), दीपक चहर (14 कोटी), शिवम दुबे (4 कोटी), महिश तिक्षाना (70 लाख), सिमरनजीतसिंग (20 लाख), डेवॉन कॉनवे (1 कोटी), ड्वेन प्रिटोरियस (50 लाख), मिचेल सॅन्टनर (1.90 कोटी), अडम मिल्न (1.90 कोटी), केएम आसिफ (20 लाख), तुषार देशपांडे (20 लाख). शुभ्रांशु सेनापती (20 लाख), मुकेश चौधरी (20 लाख), प्रशांत सोळंकी (1.20 कोटी) ,ख्रिस जॉर्डन (3.60 कोटी), एन जगदीशन (20 लाख), सी. हरी निशांत(20 लाख), भगत वर्मा(20 लाख), राजवर्धन हंगरगेकर (1.50 कोटी)
हे देखील वाचा-
- IPL 2022: आयपीएल स्पर्धा दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर? वानखेडे स्टेडियमची रेकी करणाऱ्या दहशतवाद्याला अटक
- TATA IPL: आयपीएलच्या इतिहासात 'या' पाच खेळाडूंनी ठोकल्या सर्वाधिक धावा, यादीत चार भारतीय फलंदाज
- Bangladesh Win : बांग्लादेशची दमदार कामगिरी! दक्षिण आफ्रिकेत जाऊन मिळवला मालिका विजय
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha