Ravindra Jadeja Catch CSK vs LSG: कॅच ऑफ द टूर्नामेंट..., बिबट्यासारखी झेप घेत जडेजाने टिपला झेल; ऋतुराज, राहुलसह सगळे अवाक्, Video
Ravindra Jadeja Catch CSK vs LSG: चेन्नईचा संघ सामना हरला असला तरी जडेजाने आपल्या फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाने सर्वांची मने जिंकली.
Ravindra Jadeja Catch CSK vs LSG: लखनौ सुपर जायंट्सने (LSG) चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) 8 गडी राखून पराभव केला. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या लखनौच्या संघाने सुरुवातीपासूनच आपले वर्चस्व कायम राखले. लखनौचे दोन्ही सलामीवीर केएल राहुल आणि क्विंटन डी कॉक यांनी अर्धशतके झळकावली. डी कॉकने 43 चेंडूत 54 धावा केल्या. तर राहुलने 53 चेंडूत 82 धावा करत संघाच्या 8 गडी राखून विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
लखनौविरुद्धच्या सामन्यात चेन्नईसाठी रवींद्र जडेजाने अप्रतिम कामगिरी केली. चेन्नईचा संघ सामना हरला असला तरी जडेजाने आपल्या फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाने सर्वांची मने जिंकली. जडेजाने शानदार अर्धशतक ठोकले आणि नंतर जबरदस्त झेल घेतला. जडेजाचा हा झेल पाहून चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड, गोलंदाज मथिशा पथिराणासह केएल राहुलही अवाक् झाला. तर लखनौचे क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षक जाँटी ऱ्होड्स यांनीही उभं राहून टाळ्या वाजवत जडेजाचे कौतुक केले.
नेमकं काय घडलं?
जडेजाने लखनऊचा कर्णधार केएल राहुलचा सुपर कॅच घेतला. राहुल 18व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर बाद झाला. त्याने मथिशा पाथिरानाचा चेंडू पॉइंटच्या दिशेने मारला. चेंडू सीमारेषा ओलांडून जाईल असे वाटत होते, पण जडेजाने बिबट्याप्रमाणे उडी मारून चेंडू डाव्या हाताने पकडला. त्याचा झेल पाहून सगळेच अवाक् झाले. पाथिराना आणि कर्णधार रुतुराज गायकवाड यांचा विश्वास बसत नव्हता. त्याचवेळी केएल राहुलनेही आश्चर्य व्यक्त केले.
WOW!
— IndianPremierLeague (@IPL) April 19, 2024
Ravindra Jadeja takes a 𝘀𝘁𝘂𝗻𝗻𝗲𝗿 to dismiss KL Rahul for a well made 82(53)🙌
Watch here 🎥🔽#TATAIPL | #LSGvCSK
शास्त्रींनी जडेजाचे केले कौतुक-
रिप्लेमध्ये थर्ड अम्पायरने जडेजाचा झेल वारंवार पाहिला. जडेजाच्या हातातून चेंडू जमिनीला लागला की नाही हे अम्पायरने पाहायचे होते. जडेजाने क्लीन कॅच घेतला आणि राहुलला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. हा झेल पाहून अधिकृत ब्रॉडकास्टर जिओ सिनेमावर भाष्य करणाऱ्या रवी शास्त्रींनी याला 'कॅच ऑफ द टूर्नामेंट' म्हटले. रवी शास्त्रींनी जडेजाच्या झेलचे खूप कौतुक केले.
सामना कसा झाला?
लखनौचा कर्णधार राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईने 20 षटकात 6 विकेट गमावत 176 धावा केल्या. रवींद्र जडेजाने 40 चेंडूत 57 आणि महेंद्रसिंग धोनीने 9 चेंडूत 28 धावा केल्या. लखनौने 19 षटकांत 2 बाद 180 धावा करत सामना जिंकला. कर्णधार केएल राहुलने 53 चेंडूत 82 धावा केल्या. क्विंटन डी कॉकने 43 चेंडूत 54 धावा केल्या. निकोलस पूरन 12 चेंडूत 23 धावा करून नाबाद माघारी परतला आणि मार्कस स्टोइनिस 7 चेंडूत 8 धावा करून नाबाद परतला.
संबंधित बातम्या:
MS Dhoni समोर येताच केएल राहुलने काय केलं?; व्हिडीओ ठरतोय चर्चेचा विषय, चाहतेही भारावून गेले!
IPL 2024: रस्सीखेच सुरु झाली...चार संघाचे 8, तर 3 संघाचे 6 गुण; पाहा आयपीएलचे Latest Points Table
पत्नीने निर्माण केलीय वेगळी ओळख; कसं आहे मुंबईच्या संघातील टीम डेव्हिडचं खासगी आयुष्य?