CSK vs LSG IPL 2024: MS Dhoni समोर येताच केएल राहुलने काय केलं?; व्हिडीओ ठरतोय चर्चेचा विषय, चाहतेही भारावून गेले!
CSK vs LSG MS Dhoni And KL Rahul IPL: सामना संपल्यानंतर लखनौचा कर्णधार केएल राहुल आणि चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड यांची आधी भेट झाली.
CSK vs LSG MS Dhoni And KL Rahul IPL: Marathi News: लखनौ सुपर जायंट्सने (LSG) चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) 8 गडी राखून पराभव केला. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या लखनौच्या संघाने सुरुवातीपासूनच आपले वर्चस्व कायम राखले. लखनौचे दोन्ही सलामीवीर केएल राहुल आणि क्विंटन डी कॉक यांनी अर्धशतके झळकावली. डी कॉकने 43 चेंडूत 54 धावा केल्या. तर राहुलने 53 चेंडूत 82 धावा करत संघाच्या 8 गडी राखून विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने लखनौमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात शानदार फलंदाजी केली. चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात एकीकडे केएलने आपल्या उत्कृष्ट फलंदाजीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले, तर दुसरीकडे त्याने क्रिकेटप्रेमींची मनंही जिंकली. केएल राहुलचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
व्हिडीओमध्ये नेमकं काय?
सामना संपल्यानंतर लखनौ आणि चेन्नईचे खेळाडूंनी हस्तांदोलन केले. यावेळी लखनौचा कर्णधार केएल राहुल आणि चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड यांची आधी भेट झाली. ऋतुराजच्या मागून एमएस धोनी येताच केएल राहुलने त्याच्या सन्मानार्थ लगेच आपली कॅप (टोपी) काढली आणि मग हस्तांदोलन केले. केएलने ज्येष्ठ खेळाडूचा अशा प्रकारे सन्मान केल्याने चाहते भारावून गेले आहेत. त्याचा हा हावभाव क्रिकेट चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.
Nicholas Pooran with the winning runs as #LSG register their4️⃣th win of the season 🙌
— IndianPremierLeague (@IPL) April 19, 2024
They get past #CSK by 8 wickets with a comprehensive performance in Lucknow!
Recap the match on @StarSportsIndia and @JioCinema 💻📱#TATAIPL | #LSGvCSK pic.twitter.com/rxsCoKaDaR
सामना कसा झाला?
लखनौचा कर्णधार राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईने 20 षटकात 6 विकेट गमावत 176 धावा केल्या. रवींद्र जडेजाने 40 चेंडूत 57 आणि महेंद्रसिंग धोनीने 9 चेंडूत 28 धावा केल्या. लखनौने 19 षटकांत 2 बाद 180 धावा करत सामना जिंकला. कर्णधार केएल राहुलने 53 चेंडूत 82 धावा केल्या. क्विंटन डी कॉकने 43 चेंडूत 54 धावा केल्या. निकोलस पूरन 12 चेंडूत 23 धावा करून नाबाद माघारी परतला आणि मार्कस स्टोइनिस 7 चेंडूत 8 धावा करून नाबाद परतला.
संबंधित बातम्या:
शेवटचं षटक टाकण्यासाठी आला, फक्त रोहितसोबत बोलत राहिला; हार्दिकला केले दुर्लक्ष, पाहा Video
आयपीएलची नवीन मिस्ट्री गर्ल; शुभमन गिलही बघतच बसला, नेमकं प्रकरण काय? Video एकदा पाहाच!
पत्नीने निर्माण केलीय वेगळी ओळख; कसं आहे मुंबईच्या संघातील टीम डेव्हिडचं खासगी आयुष्य?