(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पंजाब किंग्जला प्लेऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी संधी; सनरायझर्स हैदराबाद खेळ बिघडवू शकतो
IPL 2021: पंजाब किंग्जसाठी आजचा सामना खूप महत्त्वाचा आहे. जर पंजाबने आज सामना गमावला तर त्यांची प्लेऑफमध्ये जाण्याची शक्यता कमी होईल.
PBKS Vs SRH: शनिवारी खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्जचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. पंजाब आणि हैदराबादचे संघ सध्या गुणतालिकेत सातव्या आणि आठव्या स्थानावर आहेत. पंजाब किंग्जला सनरायझर्स हैदराबादचा पराभव करून प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवण्याची संधी आहे.
पंजाब किंग्जला गेल्या दोन हंगामांपासून जवळच्या सामन्यांमध्ये हार स्वीकारावी लागली आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात पंजाब किंग्सने दोन धावांच्या फरकाने सामना गमावला. पंजाब किंग्जचा कर्णधार लोकेश राहुलसाठी हैदराबादविरुद्धचा सामना हा करो किंवा मरो या सामन्यासारखा आहे, संघासाठी जिंकणे आवश्यक आहे.
आयपीएल 2016 चा चॅम्पियन हैदराबाद संघाचा पंजाब किंग्जविरुद्ध चांगला रेकॉर्ड आहे. जॉनी बेअरस्टो सध्या हैदराबादसाठी आघाडीचा स्कोअरर आहे. पण, तो दुसऱ्या टप्प्यात सहभागी झाला नाही. त्याच्या अनुपस्थितीत मनीष पांडे सहा सामन्यांत 210 धावांसह सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.
हैदराबादची शेवटची आशा
सनरायझर्स हैदराबादला 8 पैकी 7 सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. सनरायझर्स हैदराबाद आता फक्त मैदानातील इतर संघांचा खेळ बिघडवण्यासाठीच उतरेल असं दिसतंय. जर हैदराबादचा संघ उर्वरित 6 सामने जिंकला तर त्याच्यासाठी संधी निर्माण होऊ शकते.
अर्शदीप सिंग पंजाबसाठी किफायतशीर ठरत आहे आणि डेथ ओव्हर्समध्ये महत्त्वपूर्ण विकेट घेत आहे. मोहम्मद शमीही गेल्या सामन्यात खूप प्रभावी ठरला आणि त्याने राजस्थानला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले.
आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्याचे संपूर्ण वेळापत्रक (IPL 2021 Second Phase Mumbai Indians Schedule)
- 19 सप्टेंबर - चेन्नई सुपर किंग्ज वि. मुंबई इंडियन्स ( सायं. 7.30)
- 20 सप्टेंबर - कोलकाता नाईट रायडर्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू ( सायं. 7.30)
- 21 सप्टेंबर - पंजाब वि.राजस्थान रॉयल्स ( सायं. 7.30)
- 22 सप्टेंबर - दिल्ली कॅपिटल्स वि. सनरायजर्स हैदराबाद ( सायं. 7.30)
- 23 सप्टेंबर - मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाईट रायडर्स ( सायं. 7.30)
- 24 सप्टेंबर- रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु वि. चेन्नई सुपर किंग्ज ( सायं. 7.30)
- 25 सप्टेंबर - दिल्ली कॅपिटल्स वि. राजस्थान रॉयल्स (दुपारी 3.30)
- सनरायजर्स हैदराबाद वि. पंजाब किंग्ज ( सायं. 7.30)
- 26 सप्टेंबर - चेन्नई सुपर किंग्ज वि. कोलकाता नाईट रायडर्स (दुपारी 3.30)
- रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू वि. मुंबई इंडियन्स ( सायं. 7.30)
- 27 सप्टेंबर - सनरायजर्स हैदराबाद वि. राजस्थान रॉयल्स ( सायं. 7.30)
- 28 सप्टेंबर - कोलकाता नाईट रायडर्स वि. दिल्ली कॅपिटल्स (दुपारी 3.30)
- मुंबई इंडियन्स वि. पंजाब किंग्ज ( सायं. 7.30 )
- 29 सप्टेंबर - राजस्थान रॉयल्स वि. रॉयल्स चॅलेंजर्स बंगळूरू ( सायं. 7.30 )
- 30 सप्टेंबर - सनरायजर्स हैदराबाद वि. चेन्नई सुपर किंग्ज ( सायं. 7.30 )
- 1 ऑक्टोबर - कोलकाता नाईट रायडर्स वि. किंग्ज पंजाब ( सायं. 7.30 )
- 2 ऑक्टोबर - मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स (दुपारी 3.30)
- राजस्थान रॉयल्स वि. चेन्नई सुपर किंग्ज ( सायं. 7.30)
- 3 ऑक्टोबर - रॉयल चॅलेंजर्स वि. पंजाब किंग्ज (दुपारी 3.30)
- कोलकाता नाईट रायडर्स वि. सनरायजर्स हैदराबाद ( सायं. 7.30)
- 4 ऑक्टोबर - दिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपर किंग्ज ( सायं. 7.30)
- 5 ऑक्टोबर - राजस्थान रॉयल्स वि. मुंबई इंडियन्स ( सायं. 7.30)
- 6 ऑक्टोबर - रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु वि, सनरायजर्स हैदराबाद ( सायं. 7.30)
- 7 ऑक्टोंबर - चेन्नई सुपर किंग्ज वि. पंजाब किंग्ज (दुपारी 3.30)
- कोलकाता नाईट रायडर्स वि. राजस्थान रॉयल्स ( सायं. 7.30)
- 8 ऑक्टोबर - सनराजर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स (दुपारी 3.30)
- रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू वि. दिल्ली कॅपिटल्स (दुपारी 3.30)
- 10 ऑक्टोबर - क्वालीफायर 1
- 11 ऑक्टोबर - एलीमिनेटर
- 13 ऑक्टोबर - क्वालीफायर 2
- 15 ऑक्टोबर फायनल