एक्स्प्लोर

किंग पहिला, हिटमॅन चौथा, धोनीचा क्रमांक कितवा? IPL मध्ये सर्वाधिक धावा करणारे टॉप 10 फलंदाज

IPL Records : आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या टॉप 10 फलंदाजामध्ये 7 भारतीय खेळाडू आहेत.

IPL Records : आयपीएल 2024 रनसंग्रामाला 22 मार्चपासून सुरुवात होत आहे. हा आयपीएलचा 17 वा (IPL 2024) हंगाम आहे. याआधी झालेल्या 16 हंगामात अनेक रेकॉर्ड झाले अन् मोडलेही. धावा, विकेट, वेगवान शतकासह अनेक विक्रम झाले आहेत. यापुढेही रेकॉर्ड (IPL Records) होतील अन् मोडतीलही.. पण आतापर्यंत 16 आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा कुणाच्या नावावर आहेत? आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या टॉप 10 फलंदाजामध्ये 7 भारतीय खेळाडू आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या दहा फलंदाजांबद्दल जाणून घेऊयात...  

1. विराट कोहली - 

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम रनमशीन विराट कोहलीच्या नावावर आहे. विराट कोहली 237 सामन्यातील 229 डावात 7263 धावा चोपल्या आहेत. यामध्ये सात शतकं आणि 50 अर्धशतकांचा समावेश आहे. विराट कोहलीने आयपीएलमध्ये 643 चौकार आणि 234 षटकार ठोकले आहेत. विराट कोहलीची सर्वोच्च धावसंख्या 113 इतकी आहे. 

2. शिखर धवन

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा जमवणाऱ्या फलंदाजांमध्ये शिखऱ धवन दुसऱ्या क्रमांकावर आहे. शिखर धवन यानं 216 डावात 6617 धावा केल्या आहेत. यादरम्यान दोन शतकं आणि 50 अर्धशतकं ठोकली आहे. शिखर धवनच्या नावावर 750 चौकार आणि 148 षटकारांची नोंद आहे. 

3. डेविड वॉर्नर 

डेविड वॉर्नरनं 176 डावात 6397 धावा केल्या आहेत. वॉर्नर याने चार षटकं आणि 60 अर्धशतकं ठोकली आहेत. डेविड वॉर्नर याने 4.54 च्या सरासरीने धावांचा पाऊस पाडलाय. वॉर्नर याने आतापर्यंत 646 चौकार आणि 226 षटकार ठोकले आहेत. 

4. रोहित शर्मा 

मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्मानं आयपीएलमध्ये 29.58 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. रोहित शर्माने 238 जावात 6211 धावा जमवल्या आहेत. रोहित शर्माच्या नावावर फक्त एका शतकाची नोंद आहे तर 42 अर्धशतकेही त्याने ठोकली आहे. रोहित शर्माने 554 चौकार आणि 257 षटकार ठोकले आहेत. 

5. सुरेश रैना - 

मिस्टर आयपीएल सुरेश रैना यानं आयपीएलच्या 200 डजावात 32.52 च्या सरासरीने 5528 धावा केल्या आहेत. रैनानं एक शतक आणि 39 अर्धशतकं ठोकली आहेत. सुरेश रैनाने  506 चौकार आणि 203 षटकार लगावले आहेत. 

6. एबी डिव्हिलिअर्स - 

मिस्टर 360 अर्थात एबी डिव्हिलिअर्स यानं 170 आयपीएल डावात 39.70 च्या सरासरीने 5162 धावांचा पाऊस पाडलाय. एबीने 251 षटकार आणि 413 चौकारांचा पाऊस पाडलाय. एबीच्या नावावर 3 शतकं आणि 40 अर्धशतकं आहेत. 

7. एमएस धोनी - 

कॅप्टन कूल एमएस धोनीने आयपीएलमध्ये आतापर्यंत 250 सामने खेळले आहेत. यामधील 218 डावात 38.79 च्या सरासरीने 5082 धावा चोपल्या आहेत. धोनीला आयपीएलमध्ये आतापर्यंत एकही शतक ठोकता आले नाही. त्यानं 24 अर्धशतकं ठोकली आहेत. धोनीने 239 षटकार आणि 349 चौकार ठोकले आहेत. 

8. ख्रिस गेल 

वेस्ट इंडिजचा विस्फोटक फंलदाज ख्रिस गेल आठव्या क्रमांकावर आहे. गेलने 141 डावात 39.72 च्या सरासरीने 4965 धावांचा पाऊस पाडलाय. ख्रिस गेल याने सहा शतके आणि 31 अर्धशतके ठोकली आहे. ख्रिस गेल याने आयपीएलमध्ये 357 षटकार लगावले आहेत. गेलच्या बॅटमधून 405 धावांचा पाऊस पडलाय. 

9. रॉबिन उथप्पा - 

रॉबिन उथप्पाने आयपीएलमध्ये 205 सामने खेळले आहेत. यामधील 197 डावात त्याने 4952 धावा काढल्या आहेत. उथप्पावा एकही शतक ठोकता आले नाही. उथप्पाने 27 अर्धशतके ठोकली आहेत. त्याने182 षटकार आणि 481 चौकार लगावले आहेत. 

10. दिनेश कार्तिक - 

विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिक याने आयपीएलच्या 242 सामन्यातील 221 डावात फलंदाजी केली. यामध्ये 20 अर्धशतकं ठोकली आहेत. दिनेश कार्तिकने 139 षटकार आणि 439 चौकारांच्या मदतीने 4516 धावा केल्या आहेत. 

अजिंक्य रहाणे 4400, अंबाती रायडू 4348, गौतम गंभीर 427 , केएल राहुल 4163 आणि फाफ ड़्यु प्लेसिस 4133 धावा केल्या आहेत. ते अनुक्रमे 11 ते 15 क्रमांकावर आहेत. 

आणखी वाचा :  

IPL ची पहिली हॅट्ट्रिक कुणी घेतली, सर्वाधिक हॅट्ट्रिक कुणाच्या नावावर ?

Pakistani Cricketer in IPL:  आफ्रीदी,  अख्तर, मलिक... 'हे' 11 पाकिस्तानी क्रिकेटर्स खेळलेत IPL

IPL मध्ये 22 वेळा हॅट्ट्रिक! रोहितनं एकदा, युवीनं दोनदा केला करिश्मा; पाहा संपूर्ण यादी

कोहली-गंभीर, स्पॉट फिक्सिंग ते शाहरुख खान बॅन, IPL मधील मोठे वाद

IPL 2024 : आले किती गेले किती... IPL चे 10 रेकॉर्ड्स अबाधित, वाचून तुम्ही व्हाल चकीत!

IPL 2024: राजस्थान रॉयल्स दिसणार नव्या रुपात, आयपीएल 2024 साठी नवी जर्सी रिलीज

रहाणेसाठी टीम इंडियाची दारं कायमची बंद, रणजीमध्येही अजिंक्यचा फ्लॉप शो!

तामिळनाडूची शरणागती, मुंबई 48 व्यांदा रणजी स्पर्धेच्या फायनलमध्ये, लॉर्ड शार्दूल चमकला!

Ranji Trophy 2024 : 482 धावा, 22 विकेट... रणजी ट्रॉफीत धमाल; भारताला मिळाला 'नवा' अश्विन!

IPL 2024 : आयपीएल 2024 आधी हैदराबादचा मोठा डाव, विश्वविजेत्याला केले कर्णधार


 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vishwajeet Kadam : आमदार विश्वजित कदमांनी चंद्रहार पाटलांना घेऊन सुरू केला प्रचार; तिरंगी लढतीवर काय म्हणाले?
आमदार विश्वजित कदमांनी चंद्रहार पाटलांना घेऊन सुरू केला प्रचार; तिरंगी लढतीवर काय म्हणाले?
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या 'या' पाच चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर पाडला पैशांचा पाऊस; तुम्ही पाहिलेत का 'हे' सिनेमे?
अमिताभ बच्चन यांच्या 'या' पाच चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर पाडला पैशांचा पाऊस; तुम्ही पाहिलेत का 'हे' सिनेमे?
Thane Loksabha 2024: प्रताप सरनाईक, मीनाक्षी शिंदे नव्हे, ठाण्यातून एकनाथ शिंदेंचा हुकमी एक्का मैदानात; नाव जवळपास निश्चित, लवकरच घोषणा
सरनाईक, मीनाक्षी शिंदे नव्हे, ठाण्यातून एकनाथ शिंदेंचा हुकमी एक्का मैदानात; नाव जवळपास निश्चित
'आदित्यला वाचवण्यासाठी मोदींना मागच्या दाराने भेटायचे, आता त्यांनाच शिव्या देताय', रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल
'आदित्यला वाचवण्यासाठी मोदींना मागच्या दाराने भेटायचे, आता त्यांनाच शिव्या देताय', रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Chhagan Bhujbal : माझ्यावरही हल्ले झाले पण मी घाबरत नाही : छगन भुजबळ : ABP MajhaRohit Pawar  Interview : आवडीचे खाणे, राजकीय ताणेबाणे;  रोहित पवार  यांच्यासोबत खास बातचीत ABP MajhaTOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 28 April 2024 : ABP MajhaUjjwal Nikam : शत्रू राष्ट्रातदेखील भारताकडे वाकड्या नजरेनं बघण्याची हिम्मत नाही - उज्ज्वल निकम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vishwajeet Kadam : आमदार विश्वजित कदमांनी चंद्रहार पाटलांना घेऊन सुरू केला प्रचार; तिरंगी लढतीवर काय म्हणाले?
आमदार विश्वजित कदमांनी चंद्रहार पाटलांना घेऊन सुरू केला प्रचार; तिरंगी लढतीवर काय म्हणाले?
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या 'या' पाच चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर पाडला पैशांचा पाऊस; तुम्ही पाहिलेत का 'हे' सिनेमे?
अमिताभ बच्चन यांच्या 'या' पाच चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर पाडला पैशांचा पाऊस; तुम्ही पाहिलेत का 'हे' सिनेमे?
Thane Loksabha 2024: प्रताप सरनाईक, मीनाक्षी शिंदे नव्हे, ठाण्यातून एकनाथ शिंदेंचा हुकमी एक्का मैदानात; नाव जवळपास निश्चित, लवकरच घोषणा
सरनाईक, मीनाक्षी शिंदे नव्हे, ठाण्यातून एकनाथ शिंदेंचा हुकमी एक्का मैदानात; नाव जवळपास निश्चित
'आदित्यला वाचवण्यासाठी मोदींना मागच्या दाराने भेटायचे, आता त्यांनाच शिव्या देताय', रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल
'आदित्यला वाचवण्यासाठी मोदींना मागच्या दाराने भेटायचे, आता त्यांनाच शिव्या देताय', रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल
Chhagan Bhujbal: मनोज जरांगे हा पंतप्रधान मोदींपेक्षा मोठा नेता आहे का? छगन भुजबळांनी फटकारलं
मनोज जरांगे हा पंतप्रधान मोदींपेक्षा मोठा नेता आहे का? छगन भुजबळांनी फटकारलं
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील सोढी बेपत्ता; मालिकेची टीम म्हणते...
'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील सोढी बेपत्ता; मालिकेची टीम म्हणते...
Vijay Shivtare : आता अजितदादांचा ऐका, आणखी किती दिवस शरद पवारांच्या नावाने मतं मागणार? विजय शिवतारेंनी रोहित पवार, सुप्रिया सुळेंना डिवचलं!
आता अजितदादांचा ऐका, आणखी किती दिवस शरद पवारांच्या नावाने मतं मागणार? विजय शिवतारेंनी रोहित पवार, सुप्रिया सुळेंना डिवचलं!
IPL 2024 Hardik Pandya: सर्वाधिक धावा केल्या, शेवटपर्यंत लढला; पण शेवटी त्यालाच जबाबदार धरला, हार्दिक काय म्हणाला?
सर्वाधिक धावा केल्या, शेवटपर्यंत लढला; पण पराभवासाठी त्यालाच जबाबदार धरला, हार्दिक काय म्हणाला?
Embed widget