GT vs CSK, 1 Innings Highlights: ऋतुराज गायकवाडचे दमदार अर्धशतक, गुजरातपुढे 173 धावांचे आव्हान
IPL 2023 Qualifier 1, GT vs CSK: ऋतुराज गायकवाडच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर चेन्नईने निर्धारित २० षटकात १७२ धावांपर्यंत मजल मारली.
IPL 2023 Qualifier 1, GT vs CSK: ऋतुराज गायकवाडच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर चेन्नईने निर्धारित २० षटकात १७२ धावांपर्यंत मजल मारली. ऋतुराज गायकवाड याने ६० धावांची खेळी केली. गायकवाडचा अपवाद वगळता चेन्नईच्या इतर फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. गुजरातच्या गोलंदाजीपुढे चेन्नईच्या फलंदाजांनी विकेट फेकल्या. शमी-शर्मा यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. गुजरातला विजयासाठी १७३ धावांचे आव्हान आहे.
क्वालिफायर सामन्यात गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेपॉक स्टेडिअमवर चेन्नईला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड आणि डेवेन कॉनवे यांनी अश्वासक सुरुवात दिली. दोघांनी पुन्हा एकदा अर्धशतकी भागिदारी केली. ऋतुराज गायकवाड याने आक्रमक फलंदाजी केली तर कॉनवे याने संयमी फलंदाजी केली.
ऋतुराज गायकवाड आणि डेवेन कॉनवे यांनी ६३ चेंडूत ८७ धावांची भागिदारी केली. ऋतुराज गायकवाड याने वादळी अर्धशतक झळकावले. ऋतराज गायकवाड याचा अडथळा मोहित शर्माने दूर केला. ऋतुराज गायकवाडला मोहित शर्माने ६० धावांवर तंबूत धाडले. ऋतुराज गायकवाड याने ४४ चेंडूत ६० धावांची खेळी केली. या खेळीत ऋतुराजने एक षटकार आणि सत चौकार लगावले. ऋतुराज गायकवाड याने चेन्नईच्या डावाला आकार दिला. पण ऋतुराज बाद झाल्यानंतर चेन्नाईचा डाव सावरला.
ऋतुराज बाद झाल्यानंतर शिवम दुबेही लगेच तंबूत परतला. दुबे याला एका धावेवर मोहम्मद शमीने तंबूत धाडले. त्यानंतर अजिंक्य रहाणे आणि कॉनवे यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण अजिंक्य रहाणे १७ धावांवर बाद झाला.. नळकांडे याने रहाणे याचा अडथळा दूर केला. रहाणे याने एका षटकारासह १७ धावांची खेळी केली. रहाणे बाद झाल्यानंतर डेवेन कॉनवेही बाद झाला. कॉनवे याने ३४ चेंडूत संयमी ४० धावांची खेळी केली. या खेळीत कॉनवे याने चार चौकार लगावले. कॉनवे आणि गायकवाड यांचा अपवाद वगळता इतर फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. अखेरीस रविंद्र जाडेजा याने झटपट धावसंख्या वाढवली.
अंबाती रायडू याने ९ चेंडूत एक चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १७ धावांचे योगदान दिलेय. धोनीला एका धावेवर मोहित शर्मा याने तंबूचा रस्ता दाखवला. रविंद्र जाडेजा याच्या फटकेबाजीमळे चेन्नई सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचली. रविंद्र जाडेजा आणि मोईन अली यांनी अखेरच्या षटकात धावांचा पाऊस पाडला. जाडेजा याने २२ धावांची खेळी केली तर मोईन अली याने ९ धावांचे योगदान दिले.
गुजरातकडून मोहम्मद शमी आणि मोहित शर्मा यांनी भेदक मारा केला. शमी-शर्मा जोडीने प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. राशिद खान, नूर अहमद आणि दर्शन नळकांडे यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.