एक्स्प्लोर
IPL 2022 : 'या' खेळाडूंना रिटेन करणं संघाना पडलं महाग, खराब कामगिरीमुळे टीमची डोकेदुखी वाढवली
IPL 2022 : आयपीएल 2022 मध्ये खराब कामगिरीमुळे काही रिटेन केलेल्या खेळाडूंनी त्यांच्या संघाची डोकेदुखी वाढवली आहे.
IPL 2022 : आयपीएल 2022 चे बऱ्यापैकी सामने पार पडले असून पुढील फेरीत पोहचणारे काही संघ तसेच स्पर्धेबाहेर जाण्याच्या मार्गावर असणारे संघ आता समोर आले आहेत. दरम्यान या हंगामात बरेच चुरशीचे सामने होत आहेत. त्यात 8 जागी 10 संघ असल्याने लिलावातही चुरस दिसून आली होती. लिलावात विविध संघात विविध बदल झाले. दरम्यान काही खेळाडूंवर कोट्यवधी खर्च करुन त्यांना पुन्हा रिटेन करणं काही संघाना महाग पडलं आहे. तर असे खेळाडू कोणते ते पाहूया...
- या यादीत सर्वात पहिलं नाव आहे. केकेआरच्य वेंकटेश अय्यरचं. वेंकटेशने 2021 मध्ये दमदार कामगिरी केली होत त्यामुळे त्याला यंदासाठी केकेआरने तब्बल 8 कोटी रुपयांना रिटेन केलं. पण त्याने यंदा गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीत निराशाजनक कामगिरी केली. वेंकटेशने 9 सामन्याक 16.50 च्या सरासरीने फलंदाजी करत केवळ 132 रन केले आहेत. तर केवळ तीन ओव्हर फेकल्या असून यात 38 धावा देत एकही विकेट घेतलेली नाही.
- केकेआरचा आणखी एक चूकलेला निर्णय म्हणजे फिरकीपटू वरुन चक्रवर्थीला त्यांनी रिटेन केलं होतं. तब्बल 8 कोटींना रिटेन केलेल्याा वरुणनने 8 सामन्यात केवळ 4 विकेट्स घेतल्या आहेत.
- चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार म्हणून निवड झालेल्या रवींद्रने काही सामन्यांपूर्वी कर्णधारपद पुन्हा धोनीला दिलं आहे. जाडेजालाही 16 कोटींना चेन्नईने रिटेन केलं होतं. पण त्याने यंदाच्या हंगामात खराब कामगिरी केली आहे. त्याने 10 सामन्यात 19.33 च्या सरासरीने 116 रन केले असून केवळ विकेट्स यंदा घेतले आहेत.
- यानंतर स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ पण यंदा खराब कामगिरीमुळे सर्वात आधी स्पर्धेबाहेर गेलेल्या मुंबई इंडियन्सचा विचार करता त्यांनी रिटेन केलेल्या दोन खेळाडूंनी खराब कामगिरी केली आहे. यात कर्णधार रोहितला 16 कोटी दिले असले तरी त्याने 10 सामन्यात 19.80 च्या सरासरीने केवळ 198 केले आहेत. त्याने एक अर्धशतकही ठोकलेलं नाही.
- मुंबईचा दुसरा खेळाडू म्हटलं तर उपकर्णधार केरॉन पोलार्ड. 6 कोटींना मुंबईत सामिल झालेल्या पोलार्डने यंदा 14.33 च्या सरासरीने केवळ 129 रन केले असून गोलंदाजीतही खास कामगिरी केलेली नाही.
- भारताचा सर्वात दमदार फलंदाज विराट कोहली यंदा खराब फॉर्ममध्ये असून आयपीएलमध्येही हा फॉर्म कायम आहे. त्याला RCB ने 15 कोटींना रिटेन केलं होतं. पण विराटने 12 सामन्यात 21.60 च्या सरासरीने 216 रन केले आहेत.
- आरसीबीचा आणखी एक स्टार खेळाडू म्हणजे ग्लेन मॅक्सवेल. त्याला संघाने 11 कोटींना रिटेन केलं. पण या अष्टपैलू खेळाडूने गोलंदाजीत खास कमाल केली नसून 9 सामन्यात 171 रनच केले आहेत.
- वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्खियाने आतापर्यंत 2 सामने खेळले असून त्याने 2 सामन्यात 70 धावा देत एकच विकेट घेतली आहे. त्याला दिल्लीने 6.50 कोटींना रिटेन केलं होतं.
- सनरायजर्स हैदराबादने अब्दुल समदला 4 कोटींना रिटेन केलं. पण या खेळाडूंना दोन सामन्यात केवळ 4 रन केले आहेत.
हे देखील वाचा
- SRH vs RCB, Match Highlights : वानिंदू हसरंगाचा 'पंच'ने हैदराबादची फलंदाजी ढासळली, त्रिपाठीची झुंज व्यर्थ, 67 धावांनी पराभव
- Team India Captaincy: 'माझ्याऐवजी धोनीला कर्णधार का बनवलं?' 'त्या' वादावर युवराज सिंह स्पष्टच बोलला
- IPL 2022 : आयपीएलसोडून राजस्थानचा मॅचविनर खेळाडू मायदेशी परतला, पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
रत्नागिरी
क्रीडा
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement