एक्स्प्लोर

SRH vs RCB, Match Highlights : वानिंदू हसरंगाचा 'पंच'ने हैदराबादची फलंदाजी ढासळली, त्रिपाठीची झुंज व्यर्थ, 67 धावांनी पराभव

IPL : बंगळुरु संघाने प्रथम फलंदाजी करत हैदराबादसमोर 193 धावांचे आव्हानात्मक लक्ष्य ठेवले होते, जे पार करताना 125 धावांवर हैदराबादचा संघ सर्वबाद झाला आहे.

SRH vs RCB : आयपीएलमधील 2022 (IPL 2022) मधील आजच्या सामन्यात रॉयल चँलेजर्स बंगळुरुने सनरायजर्स हैदराबादbj (SRH vs RCB)67 धावांनी मोठा विजय मिळवला आहे. बंगळुरुच्या गोलंदाजांनी केलेल्या अफलातून कामगिरीमुळे हा विजय झाला असून यावेळी वानिंदू हसरंगाने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत 5 विकेट्स सामन्यात घेतले. हैदराबादकडून राहुल त्रिपाठीची एकहाती झुंज व्यर्थ गेली असून त्याने अर्धशतक ठोकूनही संघ मोठ्या फरकाने पराभूत झाला आहे.

प्रथम नाणेफेक जिंकत बंगळुरुने फलंदाजीचा निर्णय घेतला. सामना दुपारी असल्याने दुसऱ्या डावात दवाची अडचण येणार नाही त्यामुळे हा निर्णय घेतला. एक मोठी धावसंख्या उभारण्याची रणनीती बंगळुरुची होती. त्यात पहिल्याच चेंडूवर विराट शून्यावर बाद झाला. पण नंतर कर्णधार फाफ डु प्लेसीस आणि रजत पाटीदारने डाव सांभाळत एक मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला. दोघांनी धावसंख्या 100 च्या पुढे नेल्यानंतर विराटला बाद करणाऱ्या जे सुचितने रजतला 48 धावांवर तंबूत धाडलं. त्यानंतर मॅक्सवेल क्रिजवर आल्यानंतर त्यानेही डाव सांभळला. पण 33 धावा करुन तोही बाद झाला. कार्तिकने त्याला बाद केलं. यावेळी अखेरची दोन षटकं खेळायला आलेल्या दिनेशने तुफान फटकेबाजी सुरु केली. त्याने अवघ्या 8 चेंडूत 30 धावा कुटल्या. यात 4 षटकार आणि 1 चौकार त्याने लगावला. आज सलामीचा सामना खेळणाऱ्या एफ फारुकीला त्याने अखेरच्या षटकात 22 धावा ठोकल्या.

193 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या हैदराबाद संघाची सुरुवातच खराब झाली. त्यांचा सलामीवीर अभिषेक आणि विल्यमसन शून्यावर बाद झाले. त्यानंतर मार्करम आणि राहुलने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मार्करम 21 धावा करुन बाद झाला. पण राहुलने झुंज कायम ठेवलं. राहुल क्रिजवर असताना दुसऱ्या बाजूने मात्र एक-एक गडी बाद होतचं होते. राहुलने 37 चेंडूत 58 धावांची एकहाती झुंज दिली खरी पण त्याला कोणाचीच साथ न मिळाल्याने अखेर तोही बाद झाला. ज्यानंतर पुढील फलंदाज काही धावा करुन तंबूत परतले आणि हैदराबादता 67 धावांनी पराभव झाला.

वानिंदूचा दमदार 'पंच'

बंगळुरुच्या फलंदाजानी 193 धावांचे दमदार लक्ष्य समोर ठेवले होते. हे पार करणं तसं शक्यही होतं. पण बंगळुरुच्या गोलंदाजांनीही भेदक गोलंदाजी करत हे आव्हान पार करुन दिलं नाही. यावेळी वानिंदू हसरंगाने सर्वोत्कृष्ट गोलंदाजी केली. त्याने 4 षटकात केवळ 18 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. यावेळी त्याने टाकलेली शेवटची आणि संघाची 17 वी ओव्हर तर मेडन ओव्हर असल्यासह यावेळी दोन विकेट्सही त्याने घेतले. याशिवाय हेझलवुडने 4 षटकात केवळ 17 धावा देत 2 विकेट्स घेतल्या

हे देखील वाचा

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Embed widget