IPL 2022, RR vs RCB : कोण खेळणार गुजरातसोबत अंतिम सामना? आज राजस्थान-बंगळुरुत लढत, कधी, कुठे पाहाल सामना?
आज आयपीएलमधील (IPL 2022) दुसरा क्वॉलीफायर सामना खेळण्यासाठी राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरुचा संघ (RR vs RCB) मैदानात उतरणार आहे.
Rajsthan Royals vs Royal challengers bangalore : आज यंदाच्या आयपीएल (IPL 2022) स्पर्धेतील अंतिम सामना खेळणारा दुसरा संघ आपल्या सर्वांसमोर येणार आहे. याआधी पहिल्या क्वॉलीफायर सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सला (GT vs RR) मात देत अंतिम सामन्यात जागा मिळवली आहे. ज्यानंतर आता आज राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरुचा संघ (RR vs RCB) मैदानात दुसरा क्लॉलीफायर सामना (IPL 2022 Qualifier 2 match) उतरणार आहे.
आज सामना होणाऱ्या या दोन्ही संघातील विजेता संघ थेट अंतिम सामना (IPL 2022 Final) खेळण्यासाठी जाणार आहे. तर पराभूत होणाऱ्या संघाचं स्पर्धेतील आव्हान संपणार आहे. त्यामुळे आजच्या या करो या मरोची परिस्थिती असणाऱ्या सामन्याकडे संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष्य लागून आह. दरम्यान आयपीएल 2022 स्पर्धेमधील हा अत्यंत महत्त्वाचा सामना कधी, कुठे पाहता येईल याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत...
कधी आहे सामना?
आज 27 मे रोजी होणारा राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. 7 वाजता नाणेफेक होईल.
कुठे आहे सामना?
हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर खेळवला जाणार आहे.
कुठे पाहता येणार सामना?
राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु हा आजचा सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला आयपीएलचे लाईव्ह कव्हरेज पाहाता येईल.
हे देखील वाचा-