एक्स्प्लोर

Rajat Patidar : बंगळुरुला सामना जिंकवणारा रजत आधी होणार होता गोलंदाज, 'या' कारणामुळे बदलला निर्णय

RCB vs LSG : बंगळुरु संघाने लखनौला 14 धावांनी मात देत क्वॉलीफायर सामन्यात एन्ट्री मिळवली. या सामन्यात विजयाचा शिल्पकार ठरलेल्या रजत पाटीदारला आधी गोलंदाज व्हायचं होतं, पण एका घटनेने त्याने निर्णय बदलला.

Rajat Patidar :  आयपीएल 2022 (Ipl 2022) स्पर्धेच्या एलिमेनेटर सामन्यात रॉयल चँलेजर्स बंगळुरुने लखनौ संघाला मात देत क्वॉलीफायर 2 मध्ये झेप घेतली आहे. सामन्यात बंगळुरु संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो फलंदाज रजत पाटीदार (Rajat Patidar). त्याने दमदार अशी 112 धावांची नाबाद खेळी केली. ज्यामुळे बंगळुरु संघाने 207 धावा करत लखनौला 208 धावांचे आव्हान दिले. जे लखनौ पूर्ण न करु शकल्याने बंगळुरु जिंकली. पण विशेष गोष्ट म्हणजे फलंदाजीने सर्वांची मनं जिंकणारा रजत आधी मात्र गोलंदाज होणार होता. तसंच त्याला त्याच्या संघातील खेळाडू 'हनुमान' म्हणत असल्याचंही समोर आलं आहे.

दुखापतीमुळे बदलला निर्णय

रजतने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात एक गोलंदाज म्हणून केली होती. पण 2014 साली फुटबॉल खेळताना त्याला दुखापत झाली, ज्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली. ज्यामुळे आठ महिने तो क्रिकेटपासून दूर होता. त्यावेळी अनेकांनी त्याला अनेक सल्ले दिले. पण त्याने त्याच्या फलंदाजीवर बराच परिश्रम घेतला. भारताचे माजी फलंदाज अमय खुरासिया यांनी त्याची ट्रेनिंग घेतली. ज्यानंतर तो एक फलंदाज म्हणून समोर आला.

सोबती खेळाडूंनी दिलं 'हनुमान' नाव

रजत मध्य प्रदेशसाठी स्थानिक क्रिकेट खेळतो. त्याने 2015 साली डेब्यू केला होता. त्याच्याबद्दल बोलताना एकदा गोलंदाज ईश्वर पांडे (Ishwar Pandey) यांनी तो संघासाठी हनुमानासारखा आहे. कायम संकटात संघाची मदत करण्यासाठी येत असतो. त्याने अनेक अशा दमदार खेळी खेळत संघाला विजय मिळवून दिला आहे. त्यामुळे रजतला हनुमान हे नाव पडलं. विशेष म्हणजे महत्त्वाच्या सामन्यात रजत आरसीबीसाठीही हनुमानच ठरला आहे.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget