![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
DC vs PBKS, Match Highlights : दिल्लीची विजयाच्या दिशेने वेगवान वाटचाल, वॉर्नर-शॉची तुफान खेळी
IPL 2022, DC vs PBKS : पंजाब संघाचा डाव अवघ्या 115 धावांच आटोपला असून आता दिल्लीला 120 चेंडूत 116 धावाच करायच्या आहेत.
![DC vs PBKS, Match Highlights : दिल्लीची विजयाच्या दिशेने वेगवान वाटचाल, वॉर्नर-शॉची तुफान खेळी IPL 2022: PBKS Given target of 116 runs against DC in Match 23 at Brabourne Stadium DC vs PBKS, Match Highlights : दिल्लीची विजयाच्या दिशेने वेगवान वाटचाल, वॉर्नर-शॉची तुफान खेळी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/20/2f0d4a0e6d865f3a7474415f4e510b6d_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
DC vs PBKS : आयपीएल 2022 (IPL 2022) मधील आजच्या 32 व्या सामन्यात दिल्ली संघाची तुफान गोलंदाजी पाहायला मिळाली. अवघ्या 115 धावांत दिल्लीने पंजाबच्या सर्व खेळाडूंना तंबूत धाडलं. विशेष म्हणजे यावेळी 7 विकेट्स या फिरकीपटूंनी घेतल्या असून कुलदीप, ललित आणि अक्षर यांनी ही कमाल केली आहे.
दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स (DC vs PBKS) यांच्यातील आजच्या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीच्या गोलंदाजांन हा निर्णय अगदी योग्य असल्याचं दाखवत पहिल्या षटकापासून पंबाजच्या गड्यांना तंबूत धाडणं सुरु ठेवलं. मयांकच्या 24 आणि जितेशच्या 32 धावा सोडता इतर फलंदाजांना खास कामगिरी करताच आली नाही. त्यामुळे पंजाबचा संघ 115 धावाच करु शकला.
दिल्ली संघाची भेदक गोलंदाजी
दिल्ली संघाकडून सर्वच गोलंदाजांनी अगदी चोख गोलंदाजी केली. शार्दूल ठाकूर सोडता प्रत्येकाने विकेट्स पटकावले. यात खलील अहमदने सर्वात बेस्ट गोलंदाजी करत 4 ओव्हरमध्ये 21 धावा देत दोन विकेट्स पटकावले आहेत. त्याच्यासोबत ललित यादव, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव या तिन्ही फिरकीपटूंनी देखील प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. तर मुस्तफिजूरने महत्त्वाची अशी मयांक अगरवालची एक विकेट घेतली आहे.
दिल्ली अंतिम 11
ऋषभ पंत (कॅप्टन), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, सरफराज खान, ललित यादव, रोवमन पोवेल, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मुस्तफिझूर रहमान, खलील अहमद.
पंजाब अंतिम 11
मयांक अगरवाल (कर्णधार), शिखर धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, जॉनी बेअरस्टो, जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहरुख खान, वैभव अरोरा, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग, नॅथन एलीस, राहुल चाहर
हे देखील वाचा-
- Virat Kohli Golden Duck: विराट कोहली चौथ्यांदा गोल्डन डकचा शिकार, चार वेळा शून्यावर गमावली विकेट
- Virat Kohli IPL Stats: आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणार विराट यंदा मात्र फ्लॉप, पाहा या मोसमात कोहलीची कामगिरी
- IPL 2022: अखेरच्या षटकात सामना फिरवणाऱ्या ओबेड मॅकॉयचं भरमैदानात पुष्पा सेलिब्रेशन, पाहा व्हिडिओ
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)