Harbhajan Singh On MS Dhoni: "धोनीनं वर्ल्डकप जिंकवला, मग बाकीचे खेळाडू लस्सी प्यायला गेले होते का?" हरभजन सिंह भडकला
Harbhajan Singh On MS Dhoni: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात भारताचा माजी फिरकीपटू हरभजनसिंह एनालिस्टच्या भूमिकेत दिसत आहे.
Harbhajan Singh On MS Dhoni: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात भारताचा माजी फिरकीपटू हरभजनसिंह एनालिस्टच्या भूमिकेत दिसत आहे. याचदरम्यान, हजभजन सिंहनं आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2011 संदर्भात मोठं वक्यव्य केलं आहे. हरभजननं 2011 चं विश्वचषक जिंकण्याचं श्रेय धोनीला दिले जात असल्यावरून टीका केली. भारताने 2011 च्या विश्वचषकाचा अंतिम सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध खेळला. ज्यामध्ये धोनीने नाबाद 91 धावांची खेळी केली होती. ज्यामुळं त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं होतं. धोनीने षटकार मारून भारतीय संघाला विश्वचषक विजेता बनवलं होतं.
स्टार स्पोर्टवर चर्चा करताना हरभजन सिंह म्हणाला की, "जेव्हा ऑस्ट्रेलिया विश्वचषक जिंकतो तेव्हा हेडिंग असं की ऑस्ट्रेलियन संघानं विश्वचषक जिंकला. जेव्हा भारतानं विश्वचषक जिंकला, तेव्हा हेडिंग आले की महेंद्रसिंह धोनीनं विश्वचषक जिंकला, मग इतर खेळाडू लस्सी प्यायला गेले होते का? बाकीच्या 10 जणांनी काय केलं? गौतम गंभीरने काय केलं? महत्वाचं म्हणजे, हा खेळ संघावर अवलंबून असतो. संघात अकरा खेळाडू खेळत आहेत. त्यापैकी सात-आठ खेळाडू चांगलं खेळल्यानंतर तुमचा संघ पुढे जातो."
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतानं पहिल्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकला. त्यावेळी भारतानं बलाढ्य संघ वेस्ट इंडीजचा पराभव केला होता. त्यानंतर तब्बल 28 वर्षानंतर धोनीच्या नेतृत्वाखाली भारतानं दुसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषकावर नाव कोरलं. त्यानंतर 2013 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या कर्णधारपदाखाली भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आयसीसी ट्रॉफी जिंकली आहे.
हे देखील वाचा-
- Faf du Plessis on MS Dhoni: धोनीबाबत फाफ डू प्लेसिसनं केलेल्या वक्तव्यानं सर्वांचं लक्ष वेधलं, नेमकं काय म्हणाला?
- Akshar की Axar? दिल्लीच्या ऑलराऊंडरच्या स्पेलिंगमागचं नेमकं रहस्य काय? नक्की वाचा
- Washington Sundar Injured: हैदराबादची चिंता वाढणारी बातमी, वॉशिंग्टन सुंदरला दुखापत, पुढील काही सामन्यांना मुकण्याची शक्यता