Akshar की Axar? दिल्लीच्या ऑलराऊंडरच्या स्पेलिंगमागचं नेमकं रहस्य काय? नक्की वाचा
TATA IPL: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात दिल्लीचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलनं (Axar Patel) 2014 मध्ये पंजाबच्या संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं.
TATA IPL: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात दिल्लीचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलनं (Axar Patel) 2014 मध्ये पंजाबच्या संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. आयपीएलमधील त्याच्या पहिल्या सामन्यात अक्षर पटेलनं आपल्या जर्सीवर Axar असं लिहलं होतं. त्यावेळी त्याच्याबद्दल आणि त्याच्या खेळीबद्दल खूप कमी लोकांना माहिती होती. तसेच त्यानं आपल्या जर्सीवर टोपण नाव लिहलं असेल, असं अनेकांना वाटलं होतं. परंतु, एका कार्यक्रमात अक्षर पटेलनं आपल्या नावाच्या स्पेलिंगमागचं मोठं रहस्य सांगितलं. आपल्या नावाचा उच्चार Ashar होत असताना, त्याला जर्सीवर Axar का लिहावं लागतंय. याचं कारणही त्यानं त्या क्रायक्रमात सांगितलंय. दरम्यान, त्यानं सांगितलेलं कारण ऐकून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
पंजाबच्या संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण करणार अक्षर पटेल सध्या दिल्लीच्या संघाकडून खेळताना मैदानात गाजवत आहे. परंतु, अक्षरच्या नावाचा स्पेलिंग Akshar अशी असताना तो आपल्या जर्सीमागं Axar का लिहतो? या प्रश्नांचं उत्तर अनेकांना जाणून घ्यायचं आहे. ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स कार्यक्रमात गौरव कपूरशी बोलताना पटेलनं त्याच्या नावाच्या स्पेलिंगमागचं रहस्य सांगितलं.
अक्षर पटेलनं काय सांगितलं?
"माझ्या नावाची खरी स्पेलिंग Akshar आहे. अंडर-19 वर्ल्डकपपूर्वी मी अंडर-19 कॅम्पसाठी बंगळुरूमध्ये होतो. संघ ऑस्ट्रेलियाला जात होता आणि प्रत्येकानं मला पासपोर्ट काढण्यास सांगितलं. मला पासपोर्ट बनवण्यासाठी लायसन्स आणि शाळा सोडल्याचा दाखला हवा होता. तेव्हा मी 17 वर्षांचा होतो. मग त्या वयात मला ड्रायव्हिंग लायसन्स कसा मिळेल? मी शाळेत असताना माझ्या मुख्यधापकांनी माझ्या शाळेच्या दाखल्यावर Axar असं लिहलं होतं. दरम्यान, तुझ्या नावाची स्पेलिंग Akshar असताना तुझ्या पासपोर्टवर Axar असं का लिहलं आहे? असं एनसीएमधील एका व्यक्तीनं मला विचारलं. त्यानंतर मी माझ्या पालकांना फोन लावला आणि याबद्दल विचारलं. त्यावेळी त्यांनी आता काहीच होऊ शकत नाही, असं उत्तर दिलं." असं अक्षर पटेलनं सांगितलं.
अक्षर पटेलची मुलाखत-
हे देखील वाचा-
- Washington Sundar Injured: हैदराबादची चिंता वाढणारी बातमी, वॉशिंग्टन सुंदरला दुखापत, पुढील काही सामन्यांना मुकण्याची शक्यता
- Hardik Pandya's New Record: हार्दिक पांड्यानं ठोकलं षटकारांचं शतक, भारताच्या दिग्गज फलंदाजांना टाकलं मागं
- Watch Video: राहुल त्रिपाठीनं एका हातानं पकडला शुभमन गिलचा अफलातून झेल, पाहून प्रेक्षकही झाले हैराण