एक्स्प्लोर

Washington Sundar Injured: हैदराबादची चिंता वाढणारी बातमी, वॉशिंग्टन सुंदरला दुखापत, पुढील काही सामन्यांना मुकण्याची शक्यता

IPL 2022: हैदराबादचे मुख्य प्रशिक्षक टॉम मूडी यांनी पत्रकार परिषदेत महत्वाची माहिती दिली आहे.

IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात खराब सुरुवात करणाऱ्या हैदराबादच्या संघानं (SRH) पुनारागमन केलं आहे. पहिल्या दोन सामन्यात पराभव स्वीकारल्यानंतर हैदराबादच्या संघानं मागील दोन सामन्यात विजय मिळवला आहे. मात्र, याचदरम्यान, हैदराबादच्या संघाला मोठा धक्का देणारी माहिती समोर आलीय. हैदराबादच्या संघाचा स्टार फिरकी गोलंदाज वॉशिंग्टन सुंदरला (Washington Sundar) दुखापत झाली आहे. ज्यामुळं त्याला पुढील काही सामन्यात खेळता येणार नाही. त्याला दुखापतीतून सावरल्यानंतरच संघात पुनरागमन करता येणार आहे. या हंगामात वॉशिंग्टन सुंदर चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता.

वॉशिंग्टन सुंदरच्या हाताला दुखापत
आयपीएलच्या 21 सामन्यात हैदराबाद आणि गुजरात यांच्यात जोरदार टक्कर झाली. या सामन्यात हैदराबादच्या संघानं आठ विकेट राखून गुजरातच्या संघाचा विजयी रथ रोखला. दरम्यान, गुजरातच्या डावात वाशिंग्टन सुंदरला दुखापत झाली. त्यानंतर त्यानं मैदान सोडलं. सुंदरला केवळ तीन षटके टाकता आली. तो मैदानाबाहेर गेल्यानंतर त्याऐवजी एडन मार्करामनं त्याची ओव्हर पूर्ण केली.

टॉम मूडी काय म्हणाले?
हैदराबादचे मुख्य प्रशिक्षक टॉम मूडी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, "वाशिंग्टन  सुंदर किमान 1-2 आठवडे संघाबाहेर असू शकतो. गुरजरात विरुद्ध सामन्यात वॉशिंग्टन सुंदरच्या उजव्या हाताला दुखापत झाली . आम्ही पुढील दोन-तीन दिवस त्यावर लक्ष ठेवणार आहोत. त्याला या दुखापतीतून सावरण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी लागू शकतो."

वॉशिंग्टन सुंदरच्या जागी कोणाला संधी मिळणार?
या मोसमात वॉशिंग्टन चांगलाच फॉर्मात आहे. पॉवरप्लेमध्ये विकेट घेण्याचा पर्याय असण्यासोबतच तो क्रमवारीत फलंदाजीतही चांगले योगदान देत होता. त्याच्या अनुपस्थितीत, आता हैदराबादला त्यांचे संयोजन बदलावं लागू शकते. श्रेयस गोपाल आणि जगदीश सुशीथ यांचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला जाऊ शकतो.

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget