IPL 2024 SRH Kavya Maran Video: भर मैदानात रडली, कमिन्ससोबत बोलली, मग थेट ड्रेसिंग रुममध्ये पोहचली; काव्या मारन खेळाडूंना काय म्हणाली?, Video
IPL 2024 SRH Kavya Maran Video: सनरायझर्स हैदराबादच्या पराभवानंतर संघाची मालकीन काव्या मारन (Kavya Maran) भर मैदानात रडताना दिसली.
IPL 2024 SRH Kavya Maran Video: आयपीएल 2024 चा अंतिम सामना 26 मे रोजी खेळवण्यात आला. कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्या झालेल्या अंतिम सामन्यात कोलकाताने बाजी मारली. कोलकाताने हैदराबादचा 8 विकेट्सने पराभव करत एकतर्फी विजय मिळवला. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील हैदराबादचं तिसऱ्यांदा जेतेपद पटकावण्याचं स्वप्न मोडलं.
सनरायझर्स हैदराबादच्या पराभवानंतर संघाची मालकीन काव्या मारन (Kavya Maran) भर मैदानात रडताना दिसली. थोडसं रडून तिने स्वतःला सावरले आणि आपल्या खेळाडूंना चिअर करण्यासाठी उभी राहिली. काव्या मारनचे रडतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. यानंतर आता सनरायझर्स हैदराबादने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये काव्या मारन हैदराबादच्या ड्रेसिंग रुममध्ये खेळाडूंचं कौतुक करताना दिसते.
काव्या मारन काय म्हणाली?
तुम्ही सर्वांनी खूप मेहनत घेतली. मला तुमचा अभिमान आहे. टी- 20 कसं खेळायचं हे तुम्ही दाखवून दिलं आणि प्रत्येक जण आपलीच चर्चा करत होते. आपल्या वाट्याला अपयश आले नव्हते आणि आज तो दिवस उजाडला. मात्र खरचं तुम्ही सर्वांनी चांगला खेळ केला. तुम्हा सर्वांचे आभार. मागच्या वर्षी आपण शेवटच्या क्रमांकावर होतो आणि यावर्षी आपण चाहत्यांच्या अपेक्षांवर खरं उतरलो. हे सर्व तुमच्यामुळे शक्य झाल्याचं काव्या मारन म्हणाली.
"You've made us proud." 🧡
— SunRisers Hyderabad (@SunRisers) May 27, 2024
- Kaviya Maran pic.twitter.com/zMZraivXEE
कोलकाताचा एकतर्फी विजय-
कोलकाताने आयपीएलच्या अंतिम सामन्यात अगदी निर्विवाद वर्चस्व गाजवलं. या सामन्यात कोलकात्याच्या गोलंदाजांनी हैदराबादचा अख्खा डाव 113 धावांत गुंडाळून आपल्या संघाला विजयाची नामी संधी मिळवून दिली. कोलकात्याच्या फलंदाजांनी विजयासाठीचं लक्ष्य अवघ्या दोन विकेट्सच्या मोबदल्यात आणि तब्बल 57 चेंडू राखून पार केलं. कोलकात्याच्या वेंकटेश अय्यरनं नाबाद 52 धावांची, तर रहमानउल्लाह गुरबाजनं 39 धावांची खेळी उभारली. त्याआधी कोलकाताकडून आंद्रे रसेलनं 19 धावात तीन फलंदाजांना माघारी धाडलं. मिचेल स्टार्क आणि हर्षित राणा प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
कोणाला कोणता पुरस्कार मिळाला?
विजेता संघ- 20 कोटी रुपये (कोलकाता)
उपविजेता संघ- 15.5 कोटी रुपये (हैदराबाद)
तिसऱ्या स्थानावरील संघ- 7 कोटी रुपये (राजस्थान)
चौथ्या स्थानावरील संघ- 6.5 कोटी रुपये (बंगळुरु)
इमर्जिंग प्लेअर- नितीशकुमार रेड्डी (हैदराबाद), 20 लाख रुपये
इलेक्ट्रिक स्ट्राईकर ऑफ द सिझन- जेक फ्रेझर मॅकगर्क (दिल्ली)
फॅन्टसी प्लेअर ऑफ द सिझन- सुनील नरेश (कोलकाता)
सुपर सिक्सेस ऑफ द सिझन- अभिषेक शर्मा (हैदराबाद)
सर्वाधिक चौकार- ट्रॅव्हिस हेड (हैदराबाद)
कॅच ऑफ द सिझन- रमणदीप सिंग (कोलकाता)
फेअरप्ले अवॉर्ड- हैदराबाद
ऑरेंज कॅप- विराट कोहली (741 धावा, बंगळुरु), 15 लाख रुपये
पर्पल कॅप- हर्षल पटेल (24 विकेट्स, पंजाब), 15 लाख रुपये
मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर- 12 (सुनील नरेन, कोलकाता), 12 लाख रुपये