IPL 2021 Point Table : बंगळुरुचं प्ले ऑफमधील आव्हान कायम तर मुंबई शेवटून दुसऱ्या स्थानावर, ऑरेंज,पर्पल कॅप कुणाकडे?
IPL 2021 Point Table : आयपीएल 2021 च्या 39 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सचा 54 धावांनी पराभव केला. या विजयानंतर पॉईंट टेबलमध्ये मोठे बदल झाले आहेत.
IPL 2021 Point Table : आयपीएल 2021 च्या 39 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सचा 54 धावांनी पराभव केला. कर्णधार विराट कोहलीच्या शानदार खेळीच्या बळावर संयुक्त अरब अमिरातीमध्ये सलग सात पराभवानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा हा पहिला विजय आहे. या विजयानंतर पॉईंट टेबलमध्ये मोठे बदल झाले आहेत. मुंबईचा संघ शेवटून दुसऱ्या स्थानावर पोहोचला असून बंगळूरु संघानं प्ले ऑफमधील आशा कायम ठेवल्या आहेत.
दरम्यान या विजयाचा मोठा फायदा आरसीबीला झाला आहे. आरसीबीचा संघ या विजयासह पॉईंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. आरसीबी सध्या 12 अंकांसह तिसऱ्या स्थानी आहे. मात्र आरसीबीचा नेच रनरेट खूपच खराब आहे. केकेआर 8 अकांसह चौथ्या स्थानी आहे. तर पंजाब देखील 8 अंकांसह पाचव्या नंबरवर आहे. राजस्थानचे देखील आठ अंक असून तो सहाव्या नंबरवर आहे. मुंबईच्या संघाची जोरदार घसरण झाली असून आठ अंक असले तरी संघ सातव्या स्थानी गेला असून आता प्ले ऑफची आशा जवळपास संपुष्टात आली आहे.
चेन्नई आणि दिल्लीच्या संघानं आपले प्ले ऑफमधील स्थान निश्चित केले आहेत. चेन्नई 16 अंकांसह नंबर वनवर आहे तर दिल्लीचे देखील 16 अंक असून दिल्ली दुसऱ्या नंबरवर विराजमान आहे. हैदराबादचा संघ केवळ दोन गुणांसह तळाला आहे.
हर्षल पटेलकडे पर्पल तर शिखरकडे ऑरेंज कॅप कायम
यंदाच्या आयपीएलमध्ये 430 धावा बनवून दिल्लीचा शिखर धवन ऑरेंज कॅप आपल्याकडेच ठेवून आहे. तर 401 धावा करत पंजाबचा कर्णधार केएल राहुल दुसऱ्या नंबरवर आहे. डु प्लेसिस 394 धावांसह तिसऱ्या स्थानी आहे.
आरसीबीचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेल सर्वाधिक विकेट घेत पर्पल कॅपचा शिलेदार आहे. हर्षलनं 10 सामन्यात 23 विकेट घेतल्या आहेत तर आवेश खान 15 विकेट घेत दुसऱ्या स्थानी आहे तर बुमराह तिसऱ्या स्थानी असून त्यानं 14 विकेट्स घेतल्या आहेत. क्रिस मॉरिसनं देखील 14 विकेट घेतल्या आहेत, तो चौथ्या स्थानी आहे.