एक्स्प्लोर

MI vs RCB, Match Highlights: यूएईमध्ये सलग सात पराभवानंतर RCB चा विजय; तर दुसऱ्या टप्प्यात मुंबईचा सलग तिसरा पराभव

IPL 2021, MI vs RCB: मुंबई पहिल्या 10 षटकांत सहजपणे हा सामना जिंकेल असे वाटत होते. पण, चहल आणि मॅक्सवेलने मधल्या षटकांत सलग बळी घेत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

Bangalore vs Mumbai: दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएल 2021 च्या 39 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सचा 54 धावांनी पराभव केला. संयुक्त अरब अमिरातीमध्ये सलग सात पराभवानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा हा पहिला विजय आहे. त्याचबरोबर आयपीएल 2021 च्या उत्तरार्धात मुंबई इंडियन्सचा हा सलग तिसरा पराभव आहे.

विराट कोहलीच्या आरसीबीने प्रथम खेळताना 20 षटकांत 6 बाद 165 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल पहिल्या 10 षटकांत 2 गडी बाद 80 च्या आसपास धावा करणारा मुंबई इंडियन्स संघ 18.1 षटकांत 111 धावांवरच आल आउट झाला. आरसीबीकडून वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने चार बळी घेतले. युझवेंद्र चहलने तीन आणि ग्लेन मॅक्सवेलने दोन बळी घेतले.

तत्पूर्वी, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या आरसीबीची सुरुवात खराबी झाली. सलामीवीर देवदत्त पडीकल दुसऱ्याच षटकात खाते न उघडता बाद झाला. यानंतर कोहली आणि भरत यांच्यात 68 धावांची भागीदारी झाली. 24 चेंडूत 32 धावा केल्यावर भरत बाद झाला. यादरम्यान त्याने दोन चौकार आणि दोन षटकार ठोकले.

यानंतर कोहली आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी आरसीबीचा डाव पुढे नेला. दोघांनीही मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली. एकेवेळ अशी होती की आरसीबी सहज 180-190 धावा करेल असे वाटत होते. पण, शेवटच्या षटकांत मुंबईच्या गोलंदाजांनी विकेट घेतल्या आणि त्यांना 165 धावांवर रोखले.

भरत 75 धावांवर बाद झाल्यानंतर कोहली आणि मॅक्सवेलने तिसऱ्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी केली. आरसीबीची धावसंख्या 15 षटकांत 120 च्या पुढे होती. पण 16 व्या षटकात कोहली 51 धावांवर बाद झाला. त्याने 42 चेंडूंचा सामना करत तीन चौकार आणि तीन षटकार मारले. यानंतर फलंदाजीसाठी आलेला एबी डिव्हिलियर्स काही खास करू शकला नाही.

19 व्या षटकात जसप्रीत बुमराहने पहिल्यांदा मॅक्सवेल (37 चेंडू 56 धावा) आणि नंतर एबी डिव्हिलियर्सला (6 चेंडूत 11 धावा) बाद केले. यानंतर 20 व्या षटकात बोल्टने शाहबाजला (01) पॅव्हेलियनमध्ये पाठवले. मुंबईकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर राहुल चहर, ट्रेंट बोल्ट आणि अॅडम मिलने यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2026 Mumbai Indians : हार्दिक पांड्यानं रोहित शर्माला थेट इशारा दिल्याचा कांगावा... सोशल मीडियावर खळबळ; मुंबई इंडियन्सने फोडला फुगा, दोन शब्दात स्पष्ट उत्तर
हार्दिक पांड्यानं रोहित शर्माला थेट इशारा दिल्याचा कांगावा... सोशल मीडियावर खळबळ; मुंबई इंडियन्सने फोडला फुगा, दोन शब्दात स्पष्ट उत्तर
MS Dhoni IPL 2026 : थालाच्या हातातील बॅट पाहून गोलंदाजांची झोप उडाली; MS धोनीचा तो एक व्हिडिओ अन् IPL च्या सगळ्या संघात खळबळ
थालाच्या हातातील बॅट पाहून गोलंदाजांची झोप उडाली; MS धोनीचा तो एक व्हिडिओ अन् IPL च्या सगळ्या संघात खळबळ
Blessing Muzarabani News : परदेशी खेळाडूचा PSL लाथ मारत IPL खेळण्याचा निर्णय; पाकिस्तानच्या तळपायाची आग मस्तकात गेली, पीसीबी करणार बॅन
परदेशी खेळाडूचा PSL लाथ मारत IPL खेळण्याचा निर्णय; पाकिस्तानच्या तळपायाची आग मस्तकात गेली, पीसीबी करणार बॅन
Harshit Rana News : टी-20 वर्ल्डकपनंतर हर्षित राणा आता IPL मधून OUT...; नेमकं काय घडलं?, KKR चे गणित बिघडले
टी-20 वर्ल्डकपनंतर हर्षित राणा आता IPL मधून OUT...; नेमकं काय घडलं?, KKR चे गणित बिघडले

व्हिडीओ

NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं
Sangli News : IPS झालेल्या आटपाडीच्या सुपुत्राची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक, पडळकरांनी वाटली साखर
Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran : होर्मुझची सामुद्रधुनी फक्त शत्रूंसाठी बंद, इतरांवर हल्ले करणार नाही, इराणचे मंत्री अब्बास अराघची यांचा दावा
होर्मुझची सामुद्रधुनी फक्त शत्रूंसाठी बंद, इतरांवर हल्ले करणार नाही, इराणचे मंत्री अब्बास अराघची यांचा दावा
Latur : लातूरमध्ये व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल, मेस आणि नाश्ता सेंटरला फटका, शैक्षणिक हबमध्ये मेसचालकांसह विद्यार्थी संकटात
लातूरमध्ये व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल, मेस आणि नाश्ता सेंटरला फटका, हजारो हॉटेल कामगारांचा रोजगार संकटात
Donald Trump : तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण, अमेरिका-इराण संघर्षात नवा ट्विस्ट
तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
Embed widget