एक्स्प्लोर
Advertisement
किंग्ज इलेव्हन पंजाबच्या सामन्यांची ठिकाणं बदलली!
यापूर्वी पंजाबचे सुरुवातीचे तीन सामने इंदूरमध्ये, तर उर्वरित सामने मोहालीत खेळवण्यात येणार होते. ''दुर्दैवाने कार्यक्रमात एवढ्या उशिरा आम्हाला बदल करावा लागला,'' असं पंजाब संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतिश मेनन म्हणाले.
मोहाली : आयपीएल फ्रँचायझी किंग्ज इलेव्हन पंजाबने या मोसमात काही बदल केल्याची घोषणा केली. बदललेल्या कार्यक्रमानुसार, लीगमधील पहिले तीन सामने आता मोहालीत खेळवले जातील. तर उर्वरित चार सामने दुसरं होमग्राऊंड इंदूरमध्ये खेळवण्यात येतील. यापूर्वी पंजाबचे सुरुवातीचे तीन सामने इंदूरमध्ये, तर उर्वरित सामने मोहालीत खेळवण्यात येणार होते.
''दुर्दैवाने कार्यक्रमात एवढ्या उशिरा आम्हाला बदल करावा लागला,'' असं पंजाब संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतिश मेनन म्हणाले.
''अडचणी नेहमीच तुमच्या समोर असतात. अशा परिस्थितीतही मोहालीतून लीगची सुरुवात करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत, कारण, दोन्हीही आमचेच होमग्राऊंड आहेत,'' असंही ते म्हणाले.
या बदलांनंतर आता मोहालीच्या मैदानावर पंजाबचा पहिला सामना 8 एप्रिल रोजी होईल. यापूर्वी हा सामना दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानात खेळवण्यात येणार होता. यानंतर मोहालीत 15 एप्रिलला चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध सामना होईल, तर 19 एप्रिलला मोहालीत सनरायझर्स हैदराबादविरुद्ध टक्कर असेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
बीड
Advertisement