एक्स्प्लोर
Advertisement
INDvsAUS : टीम इंडिया मजबूत स्थितीत, पुजारा, रहाणेची दमदार खेळी
दोघांनी मिळून चौथ्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी रचली. त्यामुळे टीम इंडियाला तीनशे धावांचा टप्पा ओलांडता आला. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायननं सर्वाधिक सहा फलंदाजांना माघारी धाडलं. मिचेल स्टार्कनं तीन आणि जॉश हेजलवूडनं एक विकेट घेतली.
अॅडलेड : चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेच्या अर्धशतकानंतरही टीम इंडियाचा दुसरा डाव 307 धावांत आटोपला. त्यामुळे अॅडलेड कसोटीत भारतानं ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 323 धावांचं आव्हान ठेवलं आहे.
पहिल्या डावात शतक झळकावणाऱ्या पुजारानं दुसऱ्या डावातही नऊ चौकारांसह 71 धावांचं योगदान दिलं. तर रहाणेनं सात चौकारांसह 70 धावांची खेळी उभारली. या दोघांनी मिळून चौथ्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी रचली. त्यामुळे टीम इंडियाला तीनशे धावांचा टप्पा ओलांडता आला. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायननं सर्वाधिक सहा फलंदाजांना माघारी धाडलं. मिचेल स्टार्कनं तीन आणि जॉश हेजलवूडनं एक विकेट घेतली.
दुसऱ्या डावाच्या सुरूवातीला लोकेश राहुल आणि मुरली विजयने सलामीच्या विकेटसाठी 63 धावांची भागीदारी रचली होती. राहुलने तीन चौकार आणि एका षटकारासह 44 धावांची खेळी साकारली. तर विजयने 18 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारानं 71 धावांची भागीदारी रचून टीम इंडियाच्या डावाला आकार दिला. पण विराट 34 धावा काढून तंबूत परतला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पुजारा 40 आणि रहाणे एका धावेवर खेळत होते.
चौथ्या दिवशी पुजाराने आपले अर्धशतक पूर्ण केले. तो 71 धावांवर बाद झाला. यानंतर आलेल्या रोहित शर्माला दुसऱ्या डावातही अपयश आले. तो केवळ एका धावेवर बाद झाला. रोहित बाद झाल्यावर आलेल्या रिषभ पंतने फटकेबाजी करत 28 धावांची खेळी केली. मात्र मोठी खेळी करण्यात त्यालाही अपयश आले. अजिंक्य रहाणे 70 धावांवर बाद झाल्यानंतर टीम इंडियाचा डाव लवकरच संपुष्टात आला. शेवटच्या तीन फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही.
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 235 धावांत आटोपला होता. ऑस्ट्रेलियाच्या ट्रेविस हेडनं एकाकी झुंज देताना सहा चौकारांसह 72 धावांची महत्वपूर्ण खेळी उभारली होती. त्यामुळे टीम इंडियाला पहिल्या डावात केवळ 15 धावांचीच आघाडी घेता आली होती.
टीम इंडियाचा पहिला डाव 250 धावांत आटोपला होता. भारतातर्फे चेतेश्वर पुजाराने 123 धावांची खेळी केली होती. पहिल्या डावात पुजारा वगळता एकाही खेळाडूला मोठी धावसंख्या उभारता आली नव्हती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement