एक्स्प्लोर
INDvsAUS : दुसऱ्या डावात भारताला 166 धावांची आघाडी
विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारानं 71 धावांची भागीदारी रचून टीम इंडियाच्या डावाला आकार दिला. पण अखेरच्या क्षणी विराट 34 धावा काढून तंबूत परतला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पुजारा 40 आणि रहाणे एका धावेवर खेळत होते.
अॅडलेड : चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीच्या अर्धशतकी भागिदारीमुळे टीम इंडियाने अॅडलेड कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर तीन बाद 151 धावांची मजल मारली आहे. त्यामुळे दुसऱ्या डावात भारताच्या हाताशी 166 धावांची भक्कम आघाडी जमा आहे.
लोकेश राहुल आणि मुरली विजयने सलामीच्या विकेटसाठी 63 धावांची भागीदारी रचली. राहुलने तीन चौकार आणि एका षटकारासह 44 धावांची खेळी साकारली. तर विजयने 18 धावांचं योगदान दिलं.
त्यानंतर विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारानं 71 धावांची भागीदारी रचून टीम इंडियाच्या डावाला आकार दिला. पण अखेरच्या क्षणी विराट 34 धावा काढून तंबूत परतला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पुजारा 40 आणि रहाणे एका धावेवर खेळत होते.
तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 235 धावांत आटोपला. ऑस्ट्रेलियाच्या ट्रेविस हेडनं एकाकी झुंज देताना सहा चौकारांसह 72 धावांची महत्वपूर्ण खेळी उभारली. त्यामुळे टीम इंडियाला पहिल्या डावात केवळ 15 धावांचीच आघाडी घेता आली होती. भारताकडून रविचंद्रन अश्विन आणि जसप्रीत बुमरानं प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. तर ईशांत शर्मानं आणि मोहम्मह शमीनं दोन फलंदाजांना माघारी धाडलं.
पावसामुळे तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रातील बराच खेळ वाया गेला. आदल्या दिवसाच्या 7 बाद 191 वरून ऑस्ट्रेलियाने खेळ सुरु केला. बुमराहने स्टार्कला (15) बाद करत आठवा गडी तंबूत पाठवला. यानंतर पावसामुळे खेळ थांबला होता. पावसानंतर खेळ सुरु झाल्यावर मोहम्मद शमीने हेड आणि हेझलवूडला लागोपाठ बाद करत ऑस्ट्रेलियाचा डाव 235 धावांवर संपुष्टात आणला.
टीम इंडियाचा पहिला डाव 250 धावांत आटोपला होता. भारतातर्फे चेतेश्वर पुजाराने 123 धावांची खेळी केली होती. पहिल्या डावात पुजारा वगळता एकाही खेळाडूला मोठी धावसंख्या उभारता आली नव्हती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement