एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
धोनी मैदानात कर्णधार नसल्याचं विसरला तेव्हा...
पुणे : कर्णधार विराट कोहली आणि त्याचा मराठमोळा शिलेदार केदार जाधव या दोघांनीही जबरदस्त शतकं ठोकून, पुण्याच्या पहिल्या वन डेत इंग्लंडला तीन विकेट्सनी नॉकआऊट पंच दिला. शतकी खेळी करणारा केदार जाधव मॅन ऑफ दी मॅचचा मानकरी ठरला.
या सामन्यात इंग्लंडने भारतीय गोलंदाजांची धुलाई करून 50 षटकांत 7 बाद 350 धावांचा डोंगर उभा केला होता. पण विराट आणि केदारने पाचव्या विकेटसाठी 147 चेंडूंत 200 धावांची भागीदारी रचून इंग्लंडचा तो डोंगर लिलया सर केला.
या सामन्यात एक क्षण असा आला जेव्हा टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी आपण कर्णधार नसल्याचंच विसरला. त्याने कर्णधार विराट कोहलीच्या अगोदरच डीएरएससाठी इशारा केला.
हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर 27 व्या ओव्हरमध्ये इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गन खेळत असताना हा क्षण आला. मॉर्गनच्या कटचा झेल धोनीच्या हातात गेल्यानंतर त्याने बाद देण्यासाठी अपील केली. मात्र अम्पायरने त्याला नकार दिला. पण त्याचवेळी धोनीने तातडीने डीआरएससाठी इशारा केला.
डीआरएससाठी इशारा केवळ कर्णधाराला करता येतो. मात्र धोनी कदाचित हे विसरला आणि त्याने विराटच्या आधीच डीआरएससाठी इशारा केला. विराटनेही धोनीचा आत्मविश्वास पाहत डीआरएससाठी इशारा केला.
धोनीचा हा आत्मविश्वास अगदी खरा ठरला. अम्पायरने दिलेला निर्णय चुकीचा ठरत इयॉन मॉर्गनला तंबूत परतावं लागलं.
पाहा व्हिडिओ :
संबंधित बातम्या :
क्रॅम्पमुळे केदार कोसळला, मात्र त्याचवेळी ड्रेसिंगरुममधून मेेसेज आला!
कोहलीमुळेच मोठी इनिंग खेळू शकलो : केदार जाधव
केदारसोबतची भागीदारी विसरु शकणार नाही : कोहली
केदारचं शतक ही भारतीयाने वनडेत ठोकलेली पाचवी फास्टेस्ट सेंच्युरी
भारताकडून दुसऱ्यांदा 350 पेक्षा जास्त धावांचा यशस्वी पाठलाग
पुणे वन डेत विराटची सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
पुण्यात ‘विराट’ सेनेपुढे सायबांवर संक्रांत, टीम इंडियाचा धमा’केदार’ विजय
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement