एक्स्प्लोर
दहा मिनिटांत खेळ खल्लास, भारताचा इंग्लंडवर 203 धावांनी विजय
पण बटलर आणि स्टोक्सने टिच्चून फलंदाजी करत पाचव्या विकेटसाठी 169 धावांची भागीदारी रचून भारताचा विजय लांबवला.
लंडन : टीम इंडियाने अखेर इंग्लंडचा दुसरा डाव 317 धावांत गुंडाळून नॉटिंगहॅम कसोटीत 203 धावांनी दणदणीत विजय साजरा केला. या विजयासह भारताने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पिछाडी 1-2 अशी भरुन काढली.
पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या दहा मिनिटांतच खेळ खल्लास झाला. इंग्लंडच्या स्थानिक वेळेनुसार, सकाळी 11 वाजता पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आणि 11 वाजून 10 मिनिटांनी आर अश्विनने जेम्स अँडरसनला बाद करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
या कसोटीत इंग्लंडसमोर विजयासाठी 521 धावांचं आव्हान होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना चौथ्या दिवशी उपाहाराला इंग्लंडची 4 बाद 84 अशी केविलवाणी अवस्था झाली होती. पण बटलर आणि स्टोक्सने टिच्चून फलंदाजी करत पाचव्या विकेटसाठी 169 धावांची भागीदारी रचून भारताचा विजय लांबवला. बटलरने 106 धावांची, तर स्टोक्सने 62 धावांची झुंजार खेळी उभारली.
अखेर बुमराने बटलरला पायचीत करुन, ढेपाळलेल्या भारतीय खेळाडूंमध्ये चैतन्य आणलं. त्यानंतर मग दुखापतग्रस्त जॉनी बेयरस्टोला शून्यावर माघारी धाडत, बुमरानेच भारताला सहावी विकेट मिळवून दिली. 83 व्या षटकात बुमराने या दोन्ही फलंदाजांना माघारी धाडलं.
त्यानतंर मग 85 व्या षटकात बुमराने ख्रिस वोक्सला रिषभ पंतच्या हाती झेल देण्यास भाग पाडलं. वोक्स केवळ 4 धावा करुन माघारी परतला. मग आदिल रशिद आणि स्टुअर्ट ब्रॉड या जोडीने नवव्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी रचून भारताचा विजयाचा मार्ग अडवून धरला. ब्रॉडला बुमरानेच बाद केलं. परंतु या भागीदारीने भारताला विजयासाठी पाचव्या दिवसाची प्रतीक्षा करायला भाग पाडलं.
अखेर पाचव्या दिवसाच्या तिसऱ्याच षटकात आर अश्विनने अँडरसनला बाद करत भारताचा विजय निश्चित केला. भारताकडून जसप्रीत बुमराने सर्वाधिक पाच फलंदाजांना माघारी धाडलं. ईशांत शर्माने दोन, तर मोहम्मद शमी, हार्दिक पंड्या आणि आर अश्विनने प्रत्येकी एक विकेट घेतली.
संबंधित बातम्या
नॉटिंगहॅम कसोटीवर भारताची मजबूत पकड, इंग्लंडसमोर 521 धावांचं लक्ष्य
'मला कपिल देव व्हायचं नाही, हार्दिक पंड्याचं राहू द्या'
नॉटिंगहॅम कसोटी : दुसरा दिवस पंड्याने गाजवला, भारत मजबूत स्थितीत
एकाच डावात पाच झेल, पदार्पणाच्या सामन्यातच रिषभ पंतचा विक्रम
विराटचं शतक तीन धावांनी हुकलं, पहिल्या दिवसअखेर भारत 307/6
रिषभ पंतचे कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण, भारताचा 291वा कसोटीपटू
भारत-इंग्लंड यांच्यातील तिसरी कसोटी आजपासून
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement