एक्स्प्लोर
Advertisement
INDvsAUS : सर्वात मोठा विजय मिळवण्यापासून टीम इंडिया एक पाऊल दूर
भारताने अखेरच्या वन डेत विजय मिळवल्यास ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4-1 ने विजय मिळवल्याची ही पहिलीच वेळ असेल.
नागपूर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेतला अखेरचा सामना नागपुरात खेळवला जाणार आहे. टीम इंडिया मालिकेत अगोदरच 3-1 ने आघाडीवर आहे. त्यामुळे शेवटचा सामना नावावर करुन ऑस्ट्रेलियाला आणखी एका पराभवाचा धक्का देण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न राहिल.
भारताचा पराभव करुन आतापर्यंतचा सर्वात मोठा मालिका विजय रोखण्याचा ऑस्ट्रेलियाचाही प्रयत्न असेल. कारण भारताने अखेरच्या वन डेत विजय मिळवल्यास ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4-1 ने विजय मिळवल्याची ही पहिलीच वेळ असेल.
यापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सात वेळा पाच किंवा त्यापेक्षा अधिक सामन्यांची मालिका झाली. यामध्ये भारताने दोन वेळा ऑस्ट्रेलियावर 3-2 ने मात केली. भारताने पहिल्यांदा 1986 आणि दुसऱ्यांदा 2013 साली ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता.
अखेरचा वन डे जिंकून ऑस्ट्रेलियाकडून 4-1 ने झालेल्या पराभवाचा बदला घेण्याची संधीही भारतीय संघाकडे आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताचा दारुण पराभव झाला होता. या विजयानंतर टीम इंडिया पुन्हा एकदा आयसीसी वन डे रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर विराजमान होईल.
भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात 55 सामने खेळले आहेत. यापैकी 24 सामन्यात भारताने विजय मिळवला, तर 26 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. तर पाच सामने अनिर्णित राहिले. त्यामुळे अखेरच्या वन डेत भारताने विजय मिळवल्या हा आकडा 26-25 असा होईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
निवडणूक
निवडणूक
Advertisement