एक्स्प्लोर

World Cup 2019 | क्रिकेटचा जन्मदाता देश पहिल्यांदाच विश्वविजेता, रोमहर्षक सामन्यात इंग्लंड विजयी

क्रिकेटच्या जन्मदात्याचा अर्थात इंग्लंडचा हा पहिलाच विश्वचषक किताब आहे. इंग्लंडच्या रुपात क्रिकेट जगताला 23 वर्षांनंतर नवा चॅम्पियन मिळाला आहे.

लॉर्ड्स : ऐतिहासिक, अविश्वसनीय, अद्भुत असंच वर्णन आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2019 च्या अंतिम सामन्याचं करता येईल. इयॉन मॉर्गनच्या इंग्लंडने वन डे विश्वचषकावर आपलं नाव कोरुन नवा इतिहास घडवला. शेवटच्या षटकात सामना टाय झाला, त्यानंतर सुपर ओव्हरमध्येही सामना टाय झाला. मात्र, आयसीसीच्या नियमांनुसार सर्वाधिक चौकार आणि षटकारांच्या निकषावर इंग्लंडला विश्वविजेता घोषित करण्यात आलं. क्रिकेटच्या जन्मदात्याचा अर्थात इंग्लंडचा हा पहिलाच विश्वचषक किताब आहे. सर्वाधिक चौकारांच्या आधारावर इंग्लंड विजयी न्यूझीलंडने निर्धारित 50 षटकात दिलेल्या 242 धावांच्या आव्हानाच पाठलाग करताना, इंग्लंडने 50 षटकात 241 धावा केल्या आणि सामना टाय झाला. यानंतर सामन्याच्या निकालासाठी सुपर ओव्हर खेळवण्यात आली. सुपर ओव्हरमध्ये सुरुवातीला फलंदाजी करताना इंग्लंडच्या बेन स्टोक्स आणि जोस बटलरने 15 धावा केल्या. त्यामुळे न्यूझीलंडसमोर 16 धावांचं लक्ष्य होतं. पण न्यूझीलंडला 15 धावाच करता आल्या आणि सुपर ओव्हरमध्येही सामना टाय झाला. मात्र सुपीरिअर बाऊंड्री काऊंट अर्थात सामन्याती सर्वाधिक चौकाराच्या आधारावर इंग्लंडने सामना जिंकत, विजेतेपदावर नाव कोरलं. इंग्लंडने या सामन्यात 24 तर न्यूझीलंडने 16 चौकार लगावले होते. स्टोक्सची मोलाची कामगिरी इंग्लंडच्या पहिल्या विश्वचषक विजयात बेन स्टोक्सने सर्वात मोलाची भूमिका बजावली. त्यामुळेच त्याला फायनलमधल्या सर्वोत्तम खेळाडूचा मान देण्यात आला. स्टोक्सने 98 चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 84 धावांची खेळी उभारली. त्याने जोस बटलरच्या साथीने पाचव्या विकेटसाठी 110 धावांची भागीदारी रचून इंग्लंडला पराभवाच्या संकटातून बाहेर काढलं. मग स्टोक्सनेच तळाच्या फलंदाजांना हाताशी धरुन इंग्लंडला पन्नासाव्या षटकात फायनल टाय करुन दिली. मग सुपर ओव्हरमध्ये स्टोक्सने नाबाद आठ धावांची खेळी केली. त्याने फायनलमध्ये एकदाही बाद न होता केलेल्या 92 धावा इंग्लंडच्या विश्वचषक विजयात निर्णायक ठरल्या. 23 वर्षांनी क्रिकेटविश्वात नवा विजेता दरम्यान इंग्लंडच्या रुपात क्रिकेट जगताला 23 वर्षांनंतर नवा चॅम्पियन मिळाला आहे. 1996 मध्ये श्रीलंका विश्वविजेता बनल्यानंतर क्रिकेटविश्वाला इंग्लंडच्या रुपात नवा विजेता मिळाला. याआधी 1999, 2003 आणि 2007 चा विश्वचषक ऑस्ट्रेलियानं जिंकला होता. तर 2011 मध्ये भारतीय संघ दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्यात यशस्वी ठरला होता. ऑस्ट्रेलियाने यानंतर पुन्हा एकदा पुनरागमन केलं आणि 2015 च्या विजेतेपदावर नाव कोरलं. अशाप्रकारे 1999 आणि 2015 पर्यंत क्रिकेटविश्वाला ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या रुपातच चॅम्पियन मिळाला होता, पण आता 23 वर्षांनी इंग्लंडचा संघ क्रिकेटचा बादशाह बनला आहे. या तीन विश्वचषकात विजेतेपदाची हुलकावणी याआधीही इग्लंडला विश्वचषक जिंकण्याची संधी मिळाली होती. 1979, 1987 आणि 1992 च्या विश्वचषक फायनलमध्ये क्रिकेटच्या जन्मदात्याला नशिबाची साथ मिळाली नव्हती. इंग्लंडला 1979 च्या विश्वचषक फायनलमध्ये वेस्ट इंडीज, 1987 च्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया आणि 1992 च्या विश्वचषक फायनलमध्ये पाकिस्तानने पराभूत केलं होतं. त्यामुळे इंग्लंडला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं.1992 च्या विश्वचषकानंतर इंग्लंडची गाडी जणू रुळावरुन उतरली. इंग्लंडला विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये जागा मिळवण्यासाठी 27 वर्षांची प्रतीक्षा करावी लागली. 2019 च्या विश्वचषकात 27 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर इंग्लंडने केवळ सेमीफायनल आणि फायनलमध्ये जागा मिळवली नाही, तर विश्वचषक जिंकून इतिहास रचला. आतापर्यंतचे विश्वविजेते 1975 : वेस्ट इंडीज (ऑस्ट्रेलियाचा पराभव) 1979 : वेस्ट इंडीज (इंग्लंडचा पराभव) 1983 : भारत (वेस्ट इंडीजचा पराभव) 1987 : ऑस्ट्रेलिया (इंग्लंडचा पराभव) 1992 : पाकिस्तान (इंग्लंडचा पराभव) 1996 : श्रीलंका (ऑस्ट्रेलियाचा पराभव) 1999 : ऑस्ट्रेलिया (पाकिस्तानचा पराभव) 2003 : ऑस्ट्रेलिया (भारताच पराभव) 2007 : ऑस्ट्रेलिया (श्रीलंकेचा पराभव) 2011 : भारत (श्रीलंकेचा पराभव) 2015 : ऑस्ट्रेलिया (न्यूझीलंडचा पराभव) 2019 : इंग्लंड (न्यूझीलंडचा पराभव)
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC : साहेब, माझ्यावर अन्याय का? माझं काय चुकलं? निष्ठावंत कार्यकर्त्याचा भाजपश्रेष्ठींना सवाल, उमेदवारी देताना डावलल्याची सल
साहेब, माझ्यावर अन्याय का? माझं काय चुकलं? निष्ठावंत कार्यकर्त्याचा भाजपश्रेष्ठींना सवाल, उमेदवारी देताना डावलल्याची सल
Vivek Bhimanwar : विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
आदित्य ठाकरेंच्या वरळीत शिवसेनेत नाराजी; तिकीट न मिळाल्याने शाखाप्रमुखाचा राजीनामा, दोन पदाधिकाऱ्यांचीही निराशा
आदित्य ठाकरेंच्या वरळीत शिवसेनेत नाराजी; तिकीट न मिळाल्याने शाखाप्रमुखाचा राजीनामा, दोन पदाधिकाऱ्यांचीही निराशा

व्हिडीओ

Thackeray Brothers BMC Election : मुंबईत ठाकरे ब्रँडची 'मराठी' परीक्षा
Mahayuti on Palika Election : महायुतीतल्या अंतर्गत लढाईत कुणाची सरशी? Special report
Congress And VBA Alliance : तब्बल दोन दशकानंतर मुंबईत काँग्रेस-वंचित आघाडी Special Report
Shivsena Vs BJP : ठाण्याचा हिशेब, नागपुरात चुकता? शिवसेना-भाजपमध्ये 90-40 चा फॉर्म्युला?
Prakash Ambedkar on Election 2026 :सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार? प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC : साहेब, माझ्यावर अन्याय का? माझं काय चुकलं? निष्ठावंत कार्यकर्त्याचा भाजपश्रेष्ठींना सवाल, उमेदवारी देताना डावलल्याची सल
साहेब, माझ्यावर अन्याय का? माझं काय चुकलं? निष्ठावंत कार्यकर्त्याचा भाजपश्रेष्ठींना सवाल, उमेदवारी देताना डावलल्याची सल
Vivek Bhimanwar : विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
आदित्य ठाकरेंच्या वरळीत शिवसेनेत नाराजी; तिकीट न मिळाल्याने शाखाप्रमुखाचा राजीनामा, दोन पदाधिकाऱ्यांचीही निराशा
आदित्य ठाकरेंच्या वरळीत शिवसेनेत नाराजी; तिकीट न मिळाल्याने शाखाप्रमुखाचा राजीनामा, दोन पदाधिकाऱ्यांचीही निराशा
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
मोठी बातमी : आमदार, खासदारांच्या पोरांना महापालिकांचं तिकीट नाही, भाजपचा सर्वात मोठा निर्णय
मोठी बातमी : आमदार, खासदारांच्या पोरांना महापालिकांचं तिकीट नाही, भाजपचा सर्वात मोठा निर्णय
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?
मोठी बातमी : भाजपनं पुरतं घेरलं, शिंदेसेनेचे रवींद्र धंगेकर अजित पवारांच्या भेटीला; बायको, मुलाला उमेदवारी नाकारल्याने वेगळा पर्याय?
मोठी बातमी : भाजपनं पुरतं घेरलं, शिंदेसेनेचे रवींद्र धंगेकर अजित पवारांच्या भेटीला; बायको, मुलाला उमेदवारी नाकारल्याने वेगळा पर्याय?
Embed widget