एक्स्प्लोर
चाहत्यांनो मला माफ करा, मी चुकलो : डेव्हिड वॉर्नर
बॉल टॅम्परिंग प्रकरणानंतर वॉर्नरने पहिल्यांदाच आपलं मत मांडलं. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या इतिहासातील काळा दिवस ठरलेल्या बॉल टॅम्परिंग प्रकरणात खेळाडूंना शिक्षा देण्यात आली आहे.
मुंबई : ''ऑस्ट्रेलिया आणि जगभरातील माझ्या चाहत्यांनो, मी सिडनीला परतत आहे. चुकी झाली, ज्यामुळे क्रिकेटचं मोठं नुकसान झालं. मी माझी चूक मान्य करतो आणि त्याची जबाबदारी घेतो,'' असं वॉर्नरने म्हटलं आहे. बॉल टॅम्परिंग प्रकरणानंतर वॉर्नरने पहिल्यांदाच आपलं मत मांडलं.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या इतिहासातील काळा दिवस ठरलेल्या बॉल टॅम्परिंग प्रकरणात खेळाडूंना शिक्षा देण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि माजी उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर या दोघांवरही बारा महिन्यांची बंदी घालण्यात आली, तर त्यांचा सहकारी खेळाडू कॅमेरुन बॅनक्रॉफ्टला नऊ महिने क्रिकेट खेळता येणार नाही. शिवाय स्मिथ आणि वॉर्नरला यावर्षी आयपीएलही खेळता येणार नाही.
या खेळाडूंविषयीची सर्वात वाईट गोष्ट म्हणजे, जगभरातील दिग्गज खेळाडूंनीही त्यांच्यावर टीका केली आहे.
''या चुकीचा क्रिकेट चाहत्यांना त्रास सहन करावा लागला, याची मला पूर्ण जाणीव आहे. हा त्या खेळावर काळा डाग आहे, ज्यावर मी बालपणापासून प्रेम करतो,'' असंही वॉर्नरने पुढे म्हटलं आहे.
''दीर्घ श्वास घेऊन, कुटुंब, मित्र आणि विश्वासू व्यक्तींसोबत वेळ घालवायचा आहे, लवकरच पुन्हा यावर बोलू,'' असं वॉर्नरने सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement