एक्स्प्लोर
गंभीर-लीनची ऐतिहासीक भागीदारी, कोलकात्याचा दणदणीत विजय
राजकोट : कर्णधार गौतम गंभीर आणि ख्रिस लीन यांच्या अभेद्य भागीदारीच्या बळावर कोलकाता नाईट रायडर्सने गुजरात लायन्सचा 10 विकेट्सने धुव्वा उडवला. गुजरात लायन्सने कोलकात्याला विजयासाठी 184 धावांचं आव्हान दिलं होतं.
एकही विकेट न गमावता 184 धावांचा यशस्वी पाठलाग करणारा कोलकाता आयपीएलच्या इतिहासातील पहिलाच संघ ठरला आहे.
गंभीर आणि ख्रिस लीन यांच्या अभेद्य भागीदारीनेही ऐतिहासिक विक्रमाला गवसणी घातली. आयपीएलच्या इतिहासात 185 धावांची भागीदारी करणारी गंभीर आणि लीन यांची पहिलीची सलामीवीर जोडी आहे.
यापूर्वी पुणे वॉरियर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या सलामीवीरांनी हा विक्रम केला होता. ख्रिस गेल आणि तिलकरत्ने दिलशान यांनी 2013 च्या आयपीएल मोसमात 167 धावांची भागीदारी केली होती.
गौतम गंभीरने 48 चेंडूत 76 धावांची, तर ख्रिस लीनने 41 चेंडूत 93 धावांची तुफानी खेळी केली. लीनच्या 93 धावांमध्ये 8 षटकार आणि 6 चौकारांचा समावेश आहे. गुजरात लायन्सच्या गोलंदाजांना कोलकात्याच्या एकाही सलामीवीर फलंदाजाला रोखता आलं नाही.
गुजरात लायन्सचा कर्णधार सुरेश रैनाच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्ससमोर विजयासाठी गुजरातने 184 धावांचं आव्हान ठेवलं होतं. यामध्ये रैनाने 51 चेंडूत 68 धावांची खेळी केली. तर दिनेश कार्तिकनेही 25 चेंडूत 68 धावांची खेळी उभारली.
गुजरातचा सलामीवीर ब्रँडम मॅक्युलम 35 धावांवर माघारी परतल्यानंतर दिनेश कार्तिक आणि सुरेश रैना यांच्या अभेद्य भागीदारीने गुजरातने 184 धावांचा टप्पा गाठला.
कोलकात्याकडून फिरकीपटू कुलदीप यादवने सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. तर ट्रेंट बोल्ट आणि पियुष चावला यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. अखेरच्या षटकात दिनेश कार्तिकला माघारी धाडण्यात ट्रेंट बोल्टला यश आलं.
संबंधित बातमी : GLvsKKR : गुजरातचा 10 विकेट्सने धुव्वा, कोलकात्याचा शानदार विजय
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement