एक्स्प्लोर
Advertisement
दक्षिण आफ्रिकेतील महिलेसोबतही शमीचं अफेअर : हसीन जहां
शमीची पत्नी हसीन जहां हिने पुन्हा एकदा त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
कोलकाता : टीम इंडियाचा क्रिकेटर मोहम्मद शमी याच्या अडचणीत दिवसेंदिवस आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. शमीची पत्नी हसीन जहां हिने पुन्हा एकदा त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शमीची दक्षिण आफ्रिकेमध्येही एक गर्लफ्रेंड असल्याचा दावा हसीननं केला आहे.
हसीननं आज (सोमवार) आणखी एक खळबळजनक आरोप केला आहे. 'शमी जेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला होता तेव्हा तिथं देखील एका महिलेसोबत त्याचं अफेअर सुरु होतं.' दरम्यान हे तिचे हे आरोप नेमके किती खरे आहेत हे पोलिसांच्या चौकशीनंतरच समजू शकणार आहे.
दरम्यान, याआधीही हसीननं मोहम्मद शमीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. तिने त्याच्यावर मॅच फिक्सिंगचेही आरोप केले होते.
शमीचा मॅच फिक्सिंगमध्ये हात? पत्नी हसीन जहाँच्या आरोपांनी खळबळ
“शमीने पाकिस्तानातील एका तरुणीकडून पैसे घेतले, जे इंग्लंडहून पाठवण्यात आले होते. ते पैसे का पाठवण्यात आले होते? बीसीसीआयने बुक केलेल्या हॉटेलमध्ये एखादी अनोळखी तरुणी कशी पोहोचते?”, असे गंभीर प्रश्न हसीनने उपस्थित केले आहेत.
“पाकिस्तानातील कराचीमध्ये राहणाऱ्या त्या तरुणीला शमी बोलवतो. तिच्यासाठी खास रुम बुक करतो. तिच्यासोबत त्याचे संबंध आहेत. तिच्यामार्फत इंग्लंडमधील कुणीतरी मोहम्मद भाईने पैसे पाठवल्याचे तो सांगतो. मात्र ते पैसे कसले आहेत, का दिले, याची माहिती त्याने मला अद्याप कधीच सांगितले नाही.”, असेही हसनीने एबीपी न्यूज नेटवर्कशी बोलताना सांगितले.
“अल्ला करो नि असे होऊ नये, पण तो काहीतरी फ्रॉड करु शकतो, तो देशासोबतही गद्दारी करु शकतो. माझ्याकडे पुरावे आहेत. तुम्हीही दुबईत त्या हॉटेलमध्ये जाऊन पाहू शकता की, त्याने सिंगल अॅडल्टच्या नावे बुकिंग केली होती की नाही. कोणत्या गोष्टीचे शमीने पैसे घेतले? शमीसोबत मी बोलले, त्यावेळेचं माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे, ज्यात त्याने पैसे घेतल्याचे मान्य केले आहे.”, असे हसीनने सांगितले.
संबंधित बातम्या :
फोन हरवल्यापासून शमी चांगलं वागायला लागला : हसीन जहा
पहिलं लग्न ते चीअर लीडर, शमीची पत्नी हसीनची कहाणी
पत्नीच्या सर्व आरोपांवर मोहम्मद शमीचं उत्तर, EXCLUSIVE मुलाखत
ती अत्यंत महत्त्वकांक्षी महिला, हसीन जहाच्या पहिल्या पतीचं वक्तव्य
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement