एक्स्प्लोर
Advertisement
IPL10 : इरफान पठाण गुजरात लायन्सच्या ताफ्यात
मुंबई : आयपीएलच्या दहाव्या मोसमाच्या लिलावात बोली न लागलेल्या इरफान पठाणला गुजरात लायन्स संघाने खरेदी केलं आहे. ड्वेन ब्राव्हो या मोसमातून दुखापतीमुळे बाहेर गेल्याने त्याच्याऐवजी पठाणची वर्णी लागली.
इरफान पठाणने ट्विटरवर आपली नवीन जर्सी शेअर केली आहे. या आयपीएलमध्ये सहभागी होण्यास उत्सुक असल्याचं त्याने म्हटलं आहे.
इरफान पठाण आतापर्यंत आयपीएलच्या पाच संघांमध्ये खेळला आहे. चेन्नई सुपरकिंग्ज, दिल्ली डेअरडेव्हिल्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, सनरायझर्स हैदराबाद आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्सचं त्याने प्रतिनिधित्व केलं आहे.
आयपीएलमध्ये 102 सामन्यात त्याच्या नावावर 80 विकेट्स आहेत. तर 120.57 च्या सरासरीने 1137 धावाही त्याने काढल्या आहेत. मात्र गेल्या मोसमात पुण्याकडून त्याची कामगिरी निराशाजनक राहिली. तीन सामन्यात त्याला केवळ 11 धावा काढता आल्या होत्या. तर एकही विकेट घेता आली नाही.
करिअरच्या सुरुवातीला ज्या खेळाडूची ऑलराऊंडर म्हणून कपिल देव यांच्याशी तुलना केली जात होती, ज्या खेळाडूच्या स्विंगने आणि फलंदाजीने संघात एक नवी उमेद भरण्याचं काम केलं होतं, त्याच खेळाडूला आयपीएल 10 मध्ये खरेदीदार मिळाला नाही.
टीम इंडियाचा ऑल राऊंडर खेळाडू इरफान पठाणवर सततची दुखापत आणि अनेकदा आऊट ऑफ फॉर्म राहिल्याने ही वेळ आली होती. आयपीएल लिलावात त्याच्यावर एकाही फ्रँचायझीने बोली लावली नाही.
यानंतर इरफानने सोशल मीडियावर आपलं दुःख मांडलं होतं. चाहत्यांसाठी पुन्हा पुनरागमन करु आणि या वाईट वेळेचा संयमाने सामना करीन, असं त्याने म्हटलं होतं.
संबंधित बातमी : IPL मध्ये अनसोल्ड, इरफान पठाणचा चाहत्यांना भावनिक संदेश
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement