एक्स्प्लोर
दिल्ली डेअरडेव्हिल्सची धुरा गौतम गंभीरच्या खांद्यावर
आयपीएलच्या अकराव्या मोसमासाठी दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाची धुरा गौतम गंभीरच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.
नवी दिल्ली : आयपीएलच्या अकराव्या मोसमासाठी दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाची धुरा गौतम गंभीरच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. यावर्षी झालेल्या लिलावात गंभीरला 2 कोटी 80 लाखाची बोली लावत दिल्ली संघाने खरेदी केलं होतं.
आयपीएलच्या पहिल्या तीन मोसमात गंभीर दिल्ली संघाकडून खेळला होता. पण त्यानंतर त्याने पुढच्या सर्व मोसमात शाहरुख खानच्या केकेआर संघाचं प्रतिनिधीत्व केलं. गंभीरच्या नेतृत्वाखाली केकेआर संघाने 2012 आणि 2014 साली विजेतेपदावर आपलं नाव कोरलं होतं.
आयपीएलमध्ये 148 सामन्यात गंभीरच्या नावावर 35 अर्धशतकांसह 4133 धावा जमा आहेत.
दरम्यान, यंदाच्या मोसमात सर्वच संघ नव्या समीकरणांसह उतरणार आहेत. कोलकाता नाईट रायडर्सने कर्णधारपदाची धुरा दिनेश कार्तिककडे सोपवली आहे, तर किंग्ज इलेव्हन पंजाबचं नेतृत्त्व फिरकीपटू रविचंद्रन अश्विन करणार आहे. त्यामुळे आयपीएलची उत्सुकता लागली आहे.
यंदाच्या आयपीएल मोसमाची सुरुवात वानखेडेवर मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज या लढतीने 7 एप्रिल रोजी होणार आहे. दोन वर्षांनी आयपीएलमध्ये पुनरागमन करत असलेल्या महेंद्रसिंह धोनीच्या सीएसकेचा सामना रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सशी होणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement