Ballon d'Or : 17 वर्षात प्रथमच प्रतिष्ठीत 'बलॉन डी'ओर पुरस्काराच्या शर्यतीत मेस्सी नाही..., रोनाल्डोसह 30 जणांना नॉमिनेशन
Lionel Messi : लिओनल मेस्सी याने आतापर्यंत सर्वाधिक म्हणजेच 7 वेळा 'बलॉन डी'ओर पुरस्कार मिळवला आहे. 2006 सालापासून तो दरवर्षी या अवॉर्डसाठी नॉमिनेट झाला आहे.
Ballon d'Or Nomination : जगप्रसिद्ध खेळ फुटबॉलमधील सर्वात मानाचा पुरस्कार म्हणजे 'बलॉन डी'ओर (Ballon d'Or Award). वर्षभरात सर्वोत्तम खेळ करणाऱ्या फुटबॉलपटूला हा पुरस्कार दिला जात असून यंदाच्या वर्षासाठी 30 खेळाडूंना नॉमिनेट करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक वेळा हा पुरस्कार जिंकणारा आणि मागील 17 वर्षे सलग नामांकन मिळवणारा लिओनल मेस्सीचं (Lionel Messi) नाव या यादीत नसल्याचं समोर आलं आहे.
विशेष म्हणजे मेस्सीने 1-2 नाही तर तब्बल 7 वेळा हा पुरस्कार जिंकला आहे. तसंच 2018 वगळता 2007 पासून ते 2021 पर्यंत तो 14 वेळा मेस्सी टॉप-3 मध्ये देखील राहिला आहे. मागील वर्षी म्हणजेच 2021 मध्ये मेस्सीनेच हा पुरस्कार मिळवला होता. पण यंदा 17 वर्षे एकाच क्लबकडून खेळलेल्या मेस्सीने बार्सिलोना सोडून फ्रेंच क्लब पॅरिस सेंट जर्मनसोबत (PSG) जॉईन झाला असून नव्या संघात तो हवा तसा खेळ करु शकला नसल्याचं दिसून आलं आहे. तो संघाला चॅम्पियन्स लीग क्वार्टर फायनलपर्यंतही पोहचू शकलेला नाही. विशेष म्हणजे मेस्सीसोहत नेमार देखील यंदा पुरस्काराच्या नॉमिनीजमध्ये स्थान मिळवू शकलेला नाही.
'बलॉन डी'ओर चे 30 नॉमिनीज
करीम बेन्जीमा, ख्रिस्तियानो रोनाल्डो, मोहम्मद सालाह, ट्रेन्ट अलेक्झेंडर-अर्नाल्ड, जौ कांसेलो, कासेमिरो, थीबॉट कर्टियस, केविन डी ब्रायने, लुईस डियाज, फेबिन्हो, फिल फोडेन, अर्लिंग हॉलंड, सिबेस्टियन हालर, हॅरी केन, जोशुआ किमिच, राफेल लियो, रॉबर्ट लेवानडॉस्की, रियाद मारेज, माइक मेगन, सादियो माने, कायलिन एम्बापे, लुका मोड्रिच, क्रिस्टोफर कुनकु, डार्विन ननेज, एंटोटिनो रूड्रिगर, बर्नाडो सिल्वा, सॉन ह्यूंग मिन, वर्जिल वॉन डाइक, विंसी जूनियर, दूसान व्लाहोविच.
सर्वात मानाचा पुरस्कार Ballon d'Or
Ballon d'Or अवॉर्ड फ्रांसमधील फुटबॉल मासिक 'बलॉन डी'ओरच्या वतीनं देण्यात येतो. क्लब आणि राष्ट्रीय संघातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूला दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. याची सुरुवात 1956 साली झाली, जेव्हा हा पुरस्कार स्टॅनले मॅथ्यूज यांना पहिल्यांदा देण्यात आला होता. तेव्हापासून हा अवॉर्ड दरवर्षी दिला जातो. तीन वर्षांपूर्वी म्हणजेच, 2018 पासून महिला फुटबॉलपटूंनाही हा पुरस्कार देण्यात येतो. 'बलॉन डी'ओर पुरस्कार वर्षातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूला दिला जातो. जगभरातील पत्रकार आणि चाहते या पुरस्कारासाठी त्यांच्या आवडत्या खेळाडूला मतदान करतात. या आधारावर विजेत्याची निवड केली जाते. हा पुरस्कार 1856 पासून दरवर्षी जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूला दिला जात आहे.
हे देखील वाचा-